Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गुळसुंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी गुळसुंदे येथील स्वामी विवेकानंद तुंगारतन विद्यालयातील सन 1991-92 या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 30 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात करण्यात आला. रसायनी परिसरातील हे मित्रमंडळी तब्बल 30 वर्षांनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. आपल्या वर्गमित्रांना एकत्रित आणण्याचे काम देवळोली येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी …

Read More »

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गव्हाण विद्यालयात अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र …

Read More »

नवीन पनवेलमध्ये सुवर्णकार विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे समाजाचे कार्यालय (तात्पुरत्या स्वरूपाचे) समाजाची वास्तू नवीन पनवेलमधील सेक्टर 1/एस. प्लॉट नं. 136बी येथे बसवून सत्यनारायणाची महापुजा आणि महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे आणि समाज बांधवांच्या साक्षीने समाजाचे कार्यालयाचे (कॅबिन) उद्घाटन करण्यात आले. या …

Read More »

नवीन पनवेलमध्ये अज्ञाताकडून रात्री कचरा जाळण्याचा प्रकार

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जात असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरी अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेलमधील स्थानिक रहिवासी करीत आहेत. नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पाँड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. हा कचरा …

Read More »

पनवेलमध्ये तेरापंथ जैन समाजातर्फे प्रवचन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या तेरापंथ जैन समाजाच्या वतीने तेरापंथ धर्मशनच्या साधवी प्रमुख कनक प्रभा यांचा पदारोहण अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शहरातील जैन समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात साधवी निर्वाणश्री यांच्यासह समाजाच्या प्रमुख वरिष्ठांनी …

Read More »

तळोजातून पेट्रोलजन्य ज्वलनशील पदार्थ जप्त

पनवेल : वार्ताहर तळोजा पोलीस व पनवेल तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात वापी येथून सीबीडी बेलापूर परिसरात जाणारा पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य पदार्थ भरलेला टाटा कंपनीचा टँकर जप्त केला आहे. तळोजा हद्दीत एका रिकाम्या जागेत पार्किंग केलेला हा पेट्रोलजन्य ज्वलनशील द्रव्य भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टँकर चालकाला …

Read More »

पनवेल मनपातर्फे प्रभाग स्वच्छता : रोडपालीत विशेष मोहीम; अनेकांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छतेने परिपूर्ण प्रभाग कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली रोडपाली प्रभाग क्रमांक 7 येथे रविवारी (दि. 30) सेक्टर 8ई धरण तलाव (होल्डिंग पॉईंट) येथे विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम घेण्यात आली. पनवेल महापालिका व साई समाज विकास संस्था (नेरूळ), …

Read More »

‘अटल करंडक’ एक शिस्तबद्ध एकांकिका स्पर्धा; परीक्षकांनी केले कौतुक

पनवेल : नितीन देशमुख श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या वेळी स्पर्धेच्या परीक्षकांनी …

Read More »

भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोकण विभागाची रविवारी पनवेलमध्ये बैठक

राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विभागीय बैठक रविवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या …

Read More »

बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार?

नाट्यरसिकांच्या उत्सुकतेवर आज शिक्कामोर्तब पनवेल : रामप्रहर वृत्त शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक …

Read More »