Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल मनपाच्या महासभेत विकासकामांना मंजुरी पनवेल : दादाराम मिसाळ नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 14 मधील धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या भूअंतर्गत करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे. धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा …

Read More »

मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठविण्यास आजपासून सुरुवात -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाईघाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे या काळ्या विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत …

Read More »

विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जासईत सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘रयत‘चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) सत्कार करण्यात आला.  दहागाव विभागातर्फे विद्यालयातील नूतनीकरण केलेला मुख्याध्यापक कक्ष, …

Read More »

गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. या वेळी ‘रयत‘चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. उमेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. …

Read More »

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 15 जानेवारीला सुनावणी

पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा बँकेतील 529 कोटी रुपयांहूनही अधिक रकमेच्या बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 15 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. न्यायमूर्ती अनुपस्थित असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आठ दिवसांनी वाढला …

Read More »

विजेच्या स्वयंपूर्णतेसह स्वच्छ पनवेलच्या दिशेने पाऊल; महानगरपालिकेच्या सर्वच इमारती सौरऊर्जेने उजळणार

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका मालकीच्या इमारती,  नाट्यगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र व शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 7) झालेल्या पालिका महासभेत घेण्यात आला. त्यामुळे दरमहा होणारा वीजभाराचा तिजोरीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेला केंद्र शासनामार्फत फाईव्ह …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : हरेश साठे दिवाळी अंकांनी साहित्य घडविण्याचे काम केले. मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी उचलली आहे. म्हणून भरघोस रकमेची पारितोषिके असलेली राज्यातील सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भरवली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. ते खांदा …

Read More »

उरणमध्ये सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण चारफाट्याजवळ शिवसई या नावाने आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उरणचे महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) झाले. शिवसई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती मिथुन म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. शिवसई आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सर्व प्रकारचे दाखले मिळतील त्याचा लाभ …

Read More »

पनवेल महानगरपालिकेतर्फे पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये पत्रकार दिनानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील पत्रकारांची भूमिका व सहभाग या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपायुक्त विठ्ठल डाके यांनी केले आहे. …

Read More »

ओबीसी आरक्षणाबाबत मविआ सरकार गंभीर नाही : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झालेले असताना याच सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार उदासीन …

Read More »