पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी …
Read More »तुळशीविवाह उरणमध्ये उत्साहात
उरण : वार्ताहर दिवाळीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच तुळशीविवाह, तुळशीविवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते. उरण तालुक्यातील ठिक-ठिकाणी तुळशीविवाहाला सुरुवात झाली आहे. एकादशीपासून सुरू होणारे हे विवाह पाच दिवस चालतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. उरण तालुक्यात तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुळशीविवाहापूर्वी …
Read More »काकाजीनीवाडी येथे रंगणार फॅशन शो
पनवेल : वार्ताहर आयएनआयएफडी पनवेलच्या माध्यमातून यंदाही येत्या 4 डिसेंबर रोजी पनवेलजवळील काकाजीनीवाडी येथे फॅशन इंडिया डिझायनिंगचा सोल संसेशन 3.0 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डायरेक्टर सुरेंद्रसिंग जट्टी यांनी दिली आहे. या वेळी बोलताना जट्टी यांनी सांगितले आहे की, सहा वर्षापूर्वी ही संस्था आम्ही सुरू केली होती. त्यावेळी …
Read More »मोरा जेट्टीसह परिसरातील सुविधांची दुरवस्था; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
उरण : वार्ताहर उरण येथील मोरा जेट्टीची दुरवस्था झाली असून मेरी टाइम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रवाशाच्या सुखसोईंकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. त्याकडे मेरी टाइम बोर्डने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहे. मोरा जेट्टीलगत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली …
Read More »तळोजातील मैदानात अमली पदार्थांचे सेवन
खारघर : प्रतिनिधी तळोजा सेक्टर 10 मधील मैदानात पथदिवे बंद असल्यामूळे रात्रीच्या वेळी काही तरुण गांजा या अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे प्रकार सुरू आहे. या मैदानात खेळणी असल्यामुळे मुले खेळत असतात. अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सिडकोने तळोजा सेक्टर 10 …
Read More »उसर्ली खुर्दमधील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई; ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सिडकोचे आश्वासन
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत नैना क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन सिडको नैनाच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. जाधव यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या परिसरात असंख्य इमारती उभ्या राहिल्या असून अनेक …
Read More »धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील सुकलेले पामचे झाड आणि विद्युत वहिनीवर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. प्रभागातील समस्यांचे निरसन करण्यास नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच तत्पर असतात. स्वतः जातीने हजर राहून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील याकडे यांचा जास्त कल असतो. …
Read More »पनवेल महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच होणार निश्चित
पनवेल : प्रतिनिधी महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार असून त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी मंगळवारी (दि. 16) झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली. अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, सहाय्यक वाहतुक …
Read More »उरणमधील पाणथळीने घेतला मोकळा श्वास
पाण्याला अटकाव करणारे पाच मार्ग खुले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ क्षेत्रात भरतीच्या पाण्याला अटकाव करणारे पाच बुजवलेले मार्ग खुले करण्यात आले आहे. सिडको, महसूल आणि वन विभागाचे अधिकारी, सोबतच नेटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे पर्यावरणप्रेमी तसेच मासेमारी समुदायाच्या प्रतिनिधींनी 300 हेक्टरच्या परिसरातील हे पाचही प्रवाह …
Read More »उरणमध्ये पोलिसांकडून रूट मार्च
उरण : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात उद्भवलेल्या जातीय घटनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस परिस्थिती सांभाळण्यासाठी समर्थ असून सतर्क आहेत. जनतेमध्ये तसा संदेश देण्यासाठी मंगळवारी (दि. 16) सायंकाळी 5 वाजता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper