Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कळंबोलीतील विविध समस्या मार्गी लावा; भाजप पदाधिकार्‍यांची सिडकोकडे मागणी

कळंबोली : रामप्रहर वृत्त येथील गटरावरील तुटलेल्या अवस्थेतील झाकणे, खराब रस्ते यांसह विविध नागरी समस्यांबाबत भाजप पदाधिकार्‍यांनी सिडकोच्या कार्यालयात अभियंता बनगर यांची भेट घेतली. या वेळी समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी बनकर यांच्याकडे केली. शहर मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील, सरचिटणीस दिलीप बिष्ट, उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव, …

Read More »

कर्नाळा बँक बुडाल्याचे आता शेकापलाही अधिकृतरीत्या मान्य!

आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सरकारच्या जीवावर आमदार सुभेदार पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान विधान परिषद आमदार आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष या दोघांनीही कर्नाळा बँकेबाबत नुकत्याच काढलेल्या निवेदनावरून कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडाल्याचे आता शेकापनेच अधिकृतरीत्या जाहीरपणे मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.‘बँक व्यवस्थित आहे’ असा यापूर्वी आव आणणारे आणि …

Read More »

कळंबोलीतील कोविड सेंटरकरिता पनवेल मनपा घेणार सुरक्षा रक्षक

पनवेल ः प्रतिनिधीकळंबोली येथील कोविड सेंटरकरिता पनवेल महापालिका रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणार आहे. त्याचप्रमाणे पनेवल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्याचाही निर्णय शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत घेण्यात आला.  पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

पनवेल परिसरातील 32 गावे कोरोनामुक्त!

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी वाढला होता. आजतागायत 19769 नागरिकांना पनवेल ग्रामीण भागात कोरोनाची लागण झाली. यापैकी 217 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर 19164 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला केवळ 388 सक्रिय रुग्ण पूर्ण ग्रामीण भागात आहेत. 15 ऑगस्टपासून विविध …

Read More »

पनवेलमधील सप्तसूर संगीत अकादमीच्या सूरश्री स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी पनवेलच्या सप्तसूर संगीत अकादमीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सूरश्री 2021या स्पर्धेस उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. तीन फेर्‍यात रंगलेल्या या स्पर्धेत साडेचार वर्षांच्या अवनी ते 74 वर्षांच्या कार्तिकीताईंनी भाग घेतला. यास्पर्धेमुळे  ऑनलाइन पद्धतीने घरातूनच देशभक्तीपर प्रेरणागीतानी स्वातंत्र्य दिन साजरा झाला.  ऑनलाइन पद्धतीने तीन फेर्‍यात रंगलेल्या या स्पर्धेच्या  निमित्ताने …

Read More »

कळंबुसरेत शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी प्रकल्पाचे प्रशिक्षण

उरण  : प्रतिनिधी माझी शेती, माझा सात बारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्प अंतर्गत मौजे कळंबुसरे येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग पार पडला. राज्य शासनाने नुकताच ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर सुरू केलेला आहे. त्यानुसार शेतकरी ई-पीक मोबाइल अ‍ॅपमधून स्वतः शेतात लावलेली पिके व फळबाग, …

Read More »

दिबा समर्थक राघूबाईंचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्तदि. बा. पाटील यांच्या आंदोलनात हिरिरीने भाग घेणार्‍या, त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या राघुबाई म्हात्रे यांचे बुधवारी (दि. 18) वयाच्या 103व्या वर्षी निधन झाले. वयाची शंभरी उलटली असली, तरी विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असता 10 जून रोजी झालेल्या साखळी आंदोलनात, 24 जुलैच्या सिडको घेराव आंदोलनात …

Read More »

लक्ष्मणशेठ यांचे जाणे म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचे जाणे

सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त झाल्या भावना पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, राजकीय, उद्योग आदी क्षेत्रात सातत्याने आपल्या कार्याचा आदरयुक्त दबदबा राखलेले स्व. लक्ष्मणशेठ पाटील यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आघाताने संपूर्ण पनवेलला दुःख झाले. त्यांच्या निधनाने आपल्याच कुटुंबातील व्यक्ती हरपल्याची भावना गुरुवारी (दि. 19) पनवेल येथे झालेल्या शोकसभेत व्यक्त झाली.नावडे गावातील लक्ष्मणशेठ …

Read More »

अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे पनवेल महापालिकेकडून लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंथरूणाला खिळून असणार्‍या नागरिकांच्या कोविड लसीकरणास काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. आजवर पालिका क्षेत्रातील 27  नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. अशा रुग्णांच्या लसीकरणासाठी संबधितांनी नजिकच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. अनेक कुटूंबामध्ये …

Read More »

‘व्हीके’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा पनवेल : प्रतिनिधी शहरातील व्ही. के. हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बारावीच्या 200 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून शाळेने जबाबदारी झटकली. भाजप युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष मयूरेश नेतकर यांनी 20 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. व्हीके हायस्कूलने बारावीच्या पूर्व परीक्षेचे मार्क आम्ही धरणार नाही. …

Read More »