उरण ः प्रतिनिधी, वार्ताहरअफगाणिस्तान येथून आलेला हेरॉइन या अमली पदार्थाचा 300 कोटी रुपयांचा साठा उरणच्या जेएनपीटी बंदर परिसरात जप्त करण्यात आला आहे. जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. एका कंटेरनमध्ये इराणी टॅल्कम पावडरच्या नावाखाली हे 290 किलो हेरॉइन दडविण्यात आले होते.हेरॉइनचा मोठा साठा सागरी मार्गाने भारतामध्ये आणला जाणार असून …
Read More »सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून उद्याने आणि मैदानांची पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.सिडकोच्या वतीने महापालिकेकडे …
Read More »वसुलीसाठी आता विवेक पाटलांच्या बेनामी मालमत्तांचा शोध आवश्यक
मालमत्तांवर घेतलेल्या बँक कर्जांमुळे लिलाव कठीण पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करायच्या असतील तर बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या बेनामी मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव करावा लागणार आहे. त्यामुळे आता पोलीस आणि सहकार खात्याची कसोटी लागणार आहे. गोरगरीब खातेदार आणि ठेवादारांना त्यांचे पैसे …
Read More »‘दिशा’कडून डॉक्टरांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील या डॉक्टरांचा दिशा महिला मंचच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांना झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. पेशाने डॉक्टर असलेल्या पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची मंचच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी गुरुवारी (दि. 1) भेट घेत त्यांना शुभेच्छा …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटलांचे साथीदारही होणार गजाआड
‘ईडी’पाठोपाठ आता राज्य सीआयडीही करणार कारवाई पनवेल ः प्रतिनिधीबोगस कर्ज प्रकरणे आणि भ्रष्टाचारामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील सध्या जामीन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांना अद्याप जामीन मंजूर केलेला नसल्याने ते जेलमध्येच आहेत. या प्रकरणात सहकार खात्याने केलेल्या …
Read More »आर्या वनौषधी संस्थेतर्फे वनौषधी रोपांचे डॉक्टरांना वाटप
पनवेल : वार्ताहर डॉक्टर्स डेचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेतर्फे डॉक्टररुपी देवदूतांना वनौषधी रोपे व सन्मानपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. आर्या वनौषधींच्या या कार्यक्रमास एकता आवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम येलवे, आर्या पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना केवडा, निरब्राम्ही, …
Read More »कृषी दिनानिमित्त गुळसुंद्यात विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 1) कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह मोहीम समारोप कार्यक्रम झाला. या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून …
Read More »कर्नाळा बँकेचे ठेवीदार अधांतरीच
रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर फक्त पाच लाखांपर्यंतच्या ठेवीच मिळणार परत पनवेल ः प्रतिनिधीबोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या दोन हजार 458 ठेवीदारांना विमा कंपनीचा दिलासा मिळणार नसल्याने त्यांच्या 270 कोटी 72 लाख रुपयांचे काय होणार, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. पाच …
Read More »भटके, विमुक्त जाती जमातींचे सर्वेक्षण करा; बबन बारगजे यांची राज्य सरकारकडे मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुरू केलेल्या अधिसूचित भटके, विमुक्त आणि अर्ध भटक्या जाती जमातींचे सर्वेक्षण महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजप भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. बारगजे …
Read More »तळोजा वसाहतीवर सीसीटीव्हीची नजर
पनवेल : वार्ताहर तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने फेज 1 आणि 2 मध्ये दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर अखेरीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper