पनवेल ः वार्ताहर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे कलाकार आणि लोककलावंत यांचे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई व रायगडच्या कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी कलाकार आणि लोककलावंत गेली 17 महिने घरी बसून आहेत. तरी रंगभूमी खुली करावी आणि कलाकारांच्या …
Read More »भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाद्वारे साजरा
आरोग्यसेविकांना छत्री, मास्क, सॅनिटायझरचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 6) आरोग्यदायी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी हे संकट अद्याप कायम आहे. …
Read More »चिरनेर, उरणच्या बाजारात रानभाज्या दाखल; ग्राहकांची वाढती मागणी
चिरनेर ः वार्ताहर पावसाला सुरुवात झाली की रानातील बिनखताच्या जीवनसत्त्वाने भरलेल्या हिरव्या भाज्या खायला मिळतात. उरण, चिरनेर परिसरातील आदिवासी कातकरी डोंगरावर जाऊन या भाज्या गोळा करून बाजारात विकायला आणतात. त्यामुळे आदिवासी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ह्या रानभाज्यांकडे पाहिले जाते. दरवर्षी या रानभाज्यांची लोक वाट पाहत असतात. रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची …
Read More »जेएनपीटीत माल हाताळणीमध्ये वाढ; जूनमध्ये 441,984 टीईयूची हाताळणी
उरण ः प्रतिनिधी लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गती आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये जून 2020च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78 टक्के अधिक आहे. रेल्वे …
Read More »नवघर ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी विभागात सिडको हद्दीत असणार्या नवघर गावाला गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेची तहान भागली जात नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यायाने नवघर गावाला जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नवघर …
Read More »पनवेलमधील खासगी रुग्णालयांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लससाठा
पनवेल ः प्रतिनिधी मुंबईस्थित एका नामांकित संस्थेच्या वतीने पनवेल कार्यक्षेत्रातील ज्या रुग्णालयांना कोविड लसीकरणाची परवानगी मिळाली आहे, अशा रुग्णालयांना लवकरच कोविड लसींचा साठा प्राप्त होणार आहे. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी या रुग्णालयांमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. …
Read More »कर्नाळा बँकेकडून हक्काचे पैसे न मिळाल्याने खातेदार, ठेवीदार अगतिक
दोषी संचालकांवर न्यायालयामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार पनवेल ः प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचारामुळे ज्या खातेदार आणि ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत, त्या छोटी मोठी गुंतवणूक करणार्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दोषी संचालकांविरुद्ध थेट न्यायालयातच फौजदारी गुन्हा दाखल केल्यास त्यांना न्याय मिळू शकेल. सध्या सुरू असलेल्या सरकारी कारवाईमुळे …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : चौकशीत संचालकांचे वेळकाढूपणाचे धोरण, कारवाई लांबवण्यासाठी पुढील तारीख घेण्याचे तंत्र, खातेदार आणि ठेवीदार मात्र आपल्याच पैशांपासून वंचित
पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले संचालक आणि हयात नसलेल्या संचालकांच्या वारसांना सहकार खात्याने नोटीस बजावूनही ते उपस्थित राहत नसून वेळकाढूपणा करून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. संचालकांच्या या विलंबामुळे खातेधारक आणि ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळायलाही विलंब होईल. कर्नाळा बँकेतील …
Read More »खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 3) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे …
Read More »तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्तांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा
पनवेल : प्रतिनिधी कोविड-19ची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसर्या लाटेची सांशकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि. 3) झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व संबधित विभागांना सूचना केल्या. याचबरोबर लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग, कंटेन्मेट झोन, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र, कोरोनाबाधित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper