Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मोनिका महानवर यांच्या पाठपुराव्याला यश

ऑनलाइन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती मोनिका महानवर व नगरसेविका प्रमिला पाटील यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील ध्यानमंदिर या शाळेला पालकांसमवेत जाऊन विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत व ऑनलाइन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. …

Read More »

गोवठणे ग्रामपंचायती अजब कारभार

निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वीच पाइपलाइनचे काम पूर्ण; आमदार महेश बालदींची पं.स.कडे चौकशीची मागणी उरण : वार्ताहर वरातीमागून घोडे हि म्हण तुम्ही ऐकली असेलच. असा काहीसा प्रकार गोवठणे ग्रामपंचायतमध्ये घडला आहे. शासकीय काम म्हटले की निविदानंतर मंजुरी आणि शेवटी अमंलबजावणी अशी प्रक्रिया असते, पण उरण तालुक्यातील गोवठणे ग्रामंपचायतमध्ये मात्र आधी काम नंतर …

Read More »

डुंगी ग्रामस्थांच्या समस्येसंदर्भात बैठक

पनवेल ः मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रांतधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विजय तळेकर, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार …

Read More »

पनवेलमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी पतपेढी, बँकांमध्ये मिळणार सुविधा

पनवेल ः रामप्रहर वृत्त मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. पनवेल महापालिका …

Read More »

गुरूपौर्णिमेनिमित्त गव्हाण विद्यालयात विविध कार्यक्रम

गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व भारतीय असंतोषाचे …

Read More »

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ‘सीकेटी’चे विद्यार्थी चमकले

पनवेल : रामप्रहर वृत्त कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 19-20 मध्ये घेण्यात येणारी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ती परीक्षा 23 जानेवारी 2021 रोजी झाली. या परीक्षेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले …

Read More »

भाजप खारघर मंडल महिला मोर्च्याच्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर मंडलातील महिला मोर्च्यामध्ये अनेक महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. बुधवारी (दि. 22) खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. खारघर मंडलातील चार …

Read More »

विवेक पाटील 5 ऑगस्टपर्यंत तुरुंगातच

कारागृहातील मुक्काम 14 दिवसांनी वाढला पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 5 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे तर विवेक पाटील यांच्या मागणीवरून त्यांना आता त्यांच्या घराजवळील तळोजा तुरुंगात हलविण्यात येणार आहे.प्रकृतीचे कारण पुढे करीत, ‘ऑर्थर …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून सैनिकी शिक्षणासाठी 50 हजाराची आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त सांगली येथे सैनिकी शिक्षण घेत असलेल्या पनवेलमधील आयुष गुरुप्रसाद मार्गी याला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते आयुषच्या पालकांकडे गुरुवारी (दि. 22) सुपूर्द करण्यात आला. पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील …

Read More »

उरण येथे चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ

उरण ः वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुकास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना बुधवारी (दि. 21) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजक भाजप सांस्कृतिक सेल उरण मंडल होते. द्रोणागिरी नोड येथील श्रीमती भागूबाई …

Read More »