पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता गवळी, डॉ. राजपूत, डॉ. प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह नर्सिंग स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून मोहोपाडा, चांभार्लीत विकासकामांचे भूमिपूजन
मोहोपाडा : प्रतिनिधी आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वासांबे पंचायत समिती गणातील तळेगाव आणि रिस पंचायत समिती गणातील चांभार्ली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी (दि. 14) माजी आमदार देवेंद्र साटम व भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या हस्ते झाला. सर्वप्रथम तळेगाव येथे विभागीय अध्यक्ष …
Read More »..अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
मराठा क्रांती मोर्चाचे विनोद साबळेंची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण संदर्भात 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात फेरविचार याचिका दाखल केली आहे. केंद्राने भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून गव्हाण आरोग्य केंद्राला एक लाख 30 हजारांचे वैद्यकीय साहित्य भेट
अरुणशेठ भगत यांनी केले सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ …
Read More »मळ्यातील ताज्या भाजीला पसंती
चिरनेरच्या स्थानिक शेतकर्यांमध्ये समाधान उरण : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे सामान्य जनतेच्या खाण्यापिण्याच्या गरजांवर मर्यादा आल्या असल्या तरी चिरनेरच्या बाजारात विक्रीसाठी येणार्या मळ्यातील ताज्या भाजीला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. भाजीला मागणी वाढल्याने चिरनेरच्या भाजी उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात शेतीतील उपलब्ध पाण्यावर मळ्याची शेती करणारे शेतकरी मोठ्या …
Read More »करंजाडे परिसरात निर्जंतूक फवारणी
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य पनवेल : वार्ताहर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या अक्षय तृतीया या शुभदिनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून आला होता. कोरोनामुळे दुग्धशर्करा योगाचा आनंद लुटता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना विषाणूच्या संक्रमणाचे भान सुटता कामा नये. या भूमिकेतून …
Read More »कामगार वस्तीमध्ये रेशनिंग किटचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप पनवेलच्या गुंज आणि स्पर्श फाऊंडेशनच्या मार्फत गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. विविध सामाजिक, आदिवासी, शैक्षणिक हक्क, महिला सक्षमीकरण, तंबाखू नियंत्रण कायदा, नाका कामगार तसेच घरेलू कामगार, बाल हक्क, आदी विषयावर काम करण्यासाठी …
Read More »राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर कोरोना वैश्विक महामारीच्या काळात दीड वर्ष अविरत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणार्या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तत्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आहे. सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष शितल मोरे व …
Read More »दीड हजारांच्या प्रतिक्षेत रिक्षाचालक
पनवेलमध्ये तब्बल 25 हजार लाभार्थी; राज्य शासनाकडून केवळ घोषणा, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पनवेल : वार्ताहर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात पनवेल परिसरातील एकाही रिक्षाचालकाच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. पनवेल परिसरात तब्बल 25 हजार परवानाधारक रिक्षाचालक अजूनही …
Read More »कोरोना काळात बांधपाडा ग्रामपंचायतीचा आधार
गावात सॅनिटायझर फवारणी; रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) हद्दीत कोविड 19च्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथम संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, तसेच गावातील रुग्णांना धीर देत, त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून ग्रामपंचायतीने मोफत किराणा सामान व धान्य वितरण करण्यास सुरुवात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper