Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

यूएईतून 80 मेट्रिक टन ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात दाखल

उरण : रामप्रहर वृत्त भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातून क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे. …

Read More »

लसीकरण केंद्रावरील सुविधांसंदर्भात नगरसेविका रूचिता लोंढे यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेकडून गेल्या आठवडाभरापासून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडविरोधी लसीकरणाचा दूसरा डोस सुरू झाला आहे. लसीकरणासाठी प्रभाग क्रमांक 19 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा येथे येणार्‍या नागरिकांना सुविधा निर्माण करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच पालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. प्रभाग क्रमांक …

Read More »

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत युसूफ मेहेरअली सेंटरकडून जनजागृती

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये अनेक अफवा पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत पनवेल तालुक्यातील युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने गावोगावी …

Read More »

पोलिसांसोबत राबणारे होमगार्डस् मानधनाच्या प्रतीक्षेत

उदरनिर्वाहाचा प्रश्न पनवेल : वार्ताहर लॉकडाऊनची अंमलबजावणी, सण, उत्सव, यात्रा जत्रांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने राबणारे म्हणून होमगार्डकडे पहिले जाते. त्यांनी मागील वर्षांपासून पोलीस दलाला मोठी साथ केली आहे. या वेळीही ते लॉकडाऊन अंमलबजावणीच्या उपाययोजनात आघाडीवर आहेत, मात्र या होमगार्ड चार-पाच महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील सुमारे 100 ते 200 जणांना राज्य शासनाकडून …

Read More »

करंजाडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद ; आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हा रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे करंजाडे नोडमध्ये श्री शैक्षणिक सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 9) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

नवी मुंबई महापालिकेने वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत

भाजपच्या संजय पवार यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवा पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ज्ञ नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार सेलचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.      नवी मुंबई महापालिकेने वाढत जाणार्‍या कोविड रुग्ण संख्येसाठी नवी मुंबईमधील काही छोट्या …

Read More »

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

आठवडाभरात 4202 जणांनी घेतला डोस पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये दिनांक 1 मे ते 8 मे या आठवड्यामध्ये 4202 इतक्या नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळालेला आहे. हे लसीकरण वय वर्ष 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना केले असून महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक …

Read More »

नवीन पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांना अन्नदान

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल येथील पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेमार्फत 26 एप्रिलपासून सोमवार व शुक्रवार अन्नदान वाटप करण्यात येते. त्याचे सातत्य ठेवत पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, सेक्टर 6 समोरील झोपड्यांमध्ये सुमारे 300 लोकांना मोफत अन्नदान करण्यात आले. या अन्नदानाच्या कार्याला सनी कैकाडी हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर अण्णांची पुण्यतिथी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी, शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी गोरगरिबांपर्यंत पोहचवणारे त्यांना शिक्षणाचे द्वार उघडून देणारे भगिरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 62वी पुण्यतिथी करण्यात आली. कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला …

Read More »

डुप्लीकेट कापुरची खुलेआम विक्री नागरिकांकडून कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीत कापुरला दिवसेगणिक वाढती मागणी पाहता बहुतांश ठिकाणी डुप्लीकेट कापुर विक्रीला उधाण आले असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात बहुतांश नागरीक आपआपल्या घरांत जंतुसंसर्ग होऊ नये या करीता विविध ठिकाणी कापुराच्या वड्या ठेवत आहेत. तसेच कापुराचा मोठ्या प्रमाणात घरात सायंकाळी अथवा आरती वगैरे असेल किंवा धुपारतीत …

Read More »