Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गोवठणे गावात जंतूनाशक फवारणी

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील सेव्हन स्टँडर्ड क्रेझी बडीज ग्रुप सन 1989/90 तर्फे पूर्ण गोवठणे गावात जंतूनाशक लिक्विड फवारणी शनिवारी (दि. 1) सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळचे 5 वाजेपर्यंत करण्यात आली. तरुणवर्गाने पुढाकार घेऊन सामाजिक बांधलकीच्या उद्देशाने हे कार्य केले. आमच्या ग्रुप तर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात …

Read More »

उरणमध्ये 3008 रुग्ण कोरोनामुक्त

10 हजारांहून अधिक वृद्धांचे लसीकरण उरण : वार्ताहर उरण परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी, काही सामाजिक संस्था, पोलीस, प्रशासन जीवावर उदार होऊन प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांतून उरण तालुक्यातील 3008 रुग्ण आसपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला …

Read More »

शेकापचे उरण पं. स. सभापती अॅ2ड. सागर कडू यांना न्यायालयीन कोठडी; जेलमध्ये रवानगी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी येथील पंचायत समितीचे शेकापचे सभापती अ‍ॅड. सागर कडू यांनी नऊ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सभापती अ‍ॅड. सागर कडू यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कडू यांनी अनेकांना जागा देतो असे सांगून फसवले. …

Read More »

कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी मिळून लढूया!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; उलवे नोडमधील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त उलवे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई अशाच प्रकारे आपण सर्व मिळून लढूया, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 2) येथे केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव डावलल्याने जाहीर निषेध

प्रकल्पग्रस्त संघटनांचे विरोधी पक्षनेत्यांना निवेदन उलवे नोड : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर केला गेला असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात स्थानिक …

Read More »

ट्रेकर्सच्या माध्यमातून माथेरानमधील घोडेमालकांना मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका याठिकाणी व्यवसाय करणार्‍या विविध व्यवसायिकांसह घोडेमालकांनाही बसला आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल परिसरातील ट्रॅकर्सने एकत्र येऊन जवळपास 66 हजार 600 रूपये घोड्यांच्या दाणापाण्यासाठी दिले आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक तिदार, …

Read More »

18 ते 44 वयोगटातील लसीकरणात पनवेल मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील महापालिका प्रशासनाने 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता किंबहुना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी (दि. 1) अचानक नियोजनशून्यतेने महापालिका हद्दीतील नागरिकांचे लसीकरण केले. यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या भोंगळ कारभाराची नागरिकांना प्रचिती आली, अशा शब्दांत नगरसेविका रूचिता लोंढे यांनी निषेध व्यक्त करीत …

Read More »

पनवेलमध्ये महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवारी (दि. 1) ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत व्ही. के. हायस्कूल आणि चिंतामणी हॉल येथे कोरोना नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर झाले. या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये शिवसंकल्प प्रतिष्ठाण आणि चिंणामणी हॉलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ …

Read More »

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणाला सुरुवात

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण शनिवारी (दि. 1) महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांवर सुरू करण्यात आले. लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मर्यादित मात्रा शनिवारी …

Read More »

करंजाडे वसाहतीमध्ये कोविड तपासणी, लसीकरण सुरू होणार

आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर यांनी घेतली माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसीलदार विजय तळेकर यांनी करंजाडे वसाहतीच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीची माहिती घेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत सिडकोचे …

Read More »