Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कोरोना रुग्णांसाठी 200 बेड उपलब्ध करून द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात …

Read More »

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान!

भाजपच्या शिबिरांना पनवेल परिसरात प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. त्यातच रुग्णांना अत्यावश्यक रक्ताचा तुटवडासुद्धा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे घेण्यात …

Read More »

पतंजली कमिटीकडून ऑनलाइन गुढीपाडवा

माणगाव : प्रतिनिधी महिला पतंजली योग कमिटी दक्षिण रायगड यांच्या वतीने मंगळवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने गुढीपाडवा  साजरा करण्यात आला. पतंजली योग पिठाच्या वतीने रामदेवबाबा यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला पतंजली योग समिती दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा वैशाली जंगम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. होमहवनाने …

Read More »

पेटीएम अ‍ॅपद्वारे व्यापार्‍यांची फसवणूक करणार्‍यांना अटक

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील रोडपाली येथील रिलायन्स स्मार्ट पॉईंट मॉल येथून दोन अनोळखी व्यक्तींनी जेमिनी खाद्य तेलाचे व इतर साहित्य खरेदी करून एनइएफटीद्वारे पेमेंट करण्याचा बहाणा करून ट्रान्झेक्शनचा खोटा संदेश दाखवून रिलायन्स मॉलची फसवणूक केली होती. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने …

Read More »

‘कलादर्पण’चा ऑनलाइन गाण्याचा कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलादर्पण या संस्थेचा गाण्याचा कार्यक्रम झाला. ये मोह मोह के धागे या शीर्षकाने करावके गाण्याचा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकारानी घरातून गाण्याचा आनंद घेतला. प्रसिद्ध संगीतकार विजय मनोहर यांनी कार्यक्रमाचे संकलन व तंत्रसहाय्य केले. त्याना अ‍ॅड. अतुल जोशी यांनी …

Read More »

डिएफपीसीएलकडून तळोजा पोलिसांना संगणक आणि प्रिंटर्स

पनवेल : रामप्रहर वृत्त डिएफपीसीएल अर्थात दीपक फर्टीलायजर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट दिले. दीपक फर्टीलायजर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक रसायन आणि खतनिर्माता कंपनी असून या कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट देण्यात आले आहेत. …

Read More »

वनौषधी रोपांच्या भेटी

वाढदिवसाची नवीन संकल्पना पनवेल : वार्ताहर काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देवून पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पत्रकार संजय कदम, सुभाष वाघपंजे, बाळकृष्ण कासार, विक्रम येवले, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, संजय पवार आदी उपस्थित होते. आर्या प्रहरचे संपादक सुधीर नामदेव पाटील यांच्या हस्ते पत्रकार हरेश …

Read More »

पनवेल, उरणमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

संभाव्य लॉकडाऊनचे सर्वत्र सावट पनवेल : वार्ताहर दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी व मंगळवारी पनवेल परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून आली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहने दिसून येत होती. तर पनवेलमध्ये प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी मिळेल त्या वस्तू विकत घ्यायला तोबा गर्दी …

Read More »

मोहोपाड्यात कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली. यातच …

Read More »

भाजपतर्फे आज पनवेल परिसरात रक्त-प्लाझ्मादान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. त्यातच रुग्णांना अत्यावश्यक रक्ताचा तुटवडासुद्धा वाढत आहे. याचीच जाणीव मनाशी बाळगून भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रक्तदान शिबिर 14 एप्रिल …

Read More »