116 बेडला पाइपलाइनद्वारे होणार पुरवठा पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ऑक्सिजन बेड आणि अतिदक्षता विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. या सर्व दृष्टिकोनातून या रुग्णालयात सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात …
Read More »पनवेल पोलिसांकडून अनाथांना मदत
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलिसांनी उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील वांगणी गाव येथे असलेल्या सील आश्रम नामक सेवाभावी संस्थेला मदतीचा हात दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी (दि. 15) केले. पनवेल तालुका पोलीस …
Read More »पोलिसांच्या मदतीला होमगार्ड बंदोबस्त
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई पोलीस विभागात कमी मनुष्यबळ असल्याच्या कारणास्तव कोरोना काळात नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला होमगार्ड सक्रिय झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील सात पोलीस ठाण्यात एकूण 40 होमगार्ड दाखल झाले आहेत. त्यानुसार पनवेल, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, तळोजा, …
Read More »पत्रकार अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त
पनवेल ः रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील ज्येेष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अतुल पाटील यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोरोनाने पुन्हा एकदा …
Read More »कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
मुंबई ः पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी गुरुवारी आरोग्यमंत्री …
Read More »घरगुती लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली
उरण : वार्ताहर पावसालाजवळ आला की चार महिने पुरेल असा लाल तिखट मसाला, पापड, कडधान्य व चवीसाठी घरगुती लोणचे आदी वस्तूंचा साठा महिला वर्ग करीत असतात. त्यामुळे आंब्याचे लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली असून महिला वर्ग कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. उरणमध्ये सीटीझन हायस्कूल, सोनाली शॉपिंग, गांधी चौक, राजपाल …
Read More »रिसमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने
मोहोपाडा : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोविड-19च्या दुसर्या लाटेमुळे परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रिस व रसायनी परीसरात साधेपणाने साजरी करण्यात आली. रिस कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या …
Read More »उरणमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू
उरण : वार्ताहर उरणमध्ये लसींचा साठा संपल्यामूळे बंद झालेले लसीकरण पुन्हा सुरू झाल आहे. उरण मध्ये 600 कोविशिल्ड व 100 कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध आहे, तर तो साठा संपत आल्यास दररोज आलिबागमधून आणण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी सांगितलेे. गेले दोन ते तीन दिवस …
Read More »उरण-फुंडे रस्त्यावरील पूल कोसळला; दुचाकीस्वार जखमी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील फुंडे -उरण रोडवरील पूल कोसळला असून, यामध्ये दुचाकीस्वार दिपक कासुकर जखमी झाला आहे. येथील नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने संबंधित जखमीला जेएनपीटी वसाहत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जेएनपीटीतील अन्य तीन बदरांकडे जाणार्या कामगार आणि तालुक्यातील फुंडे, जेएनपीटी वसाहत, …
Read More »जासई विद्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासईच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेजमध्ये विश्वमानव, ज्ञानसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंतीनिमित्त विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जयंतीनिमित्त विद्यालयात या महामानवाला मानवंदना देण्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper