51,664 बालकांचे लसीकरण पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पनवेल महापालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील सुमारे 51,664 बालकांना लस देण्यात आली. आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांच्या हस्ते लसीकरणास मोठा खांदा येथील मराठी शाळेत सुरुवात झाली. या वेळी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील उद्याने आणि मैदानांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील अनेक उद्याने आणि खेळाची मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि मैदाने पनवेल महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात येणार असून, यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) कळंबोलीमधील उद्याने आणि खेळांच्या …
Read More »नातं एकांकिका अटल करंडकाची मानकरी
राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइट संस्थेच्या नातं या एकांकिकेने बाजी मारत …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना काळात समाजाप्रती देवदूताप्रमाणे दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. सकाळच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 31) प्रसिद्ध कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ …
Read More »मोहोपाडा ते महड पायी दिंडी
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील मोहोपाडा येथून संकष्ट चतुर्थीनिमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती. संकष्ट चतुर्थीनिमित्त रसायनी परिसरातील वारकरी सांप्रदायाने डोंगरी …
Read More »‘चतुरंग रागा‘ने पनवेलकर श्रोते झाले मंत्रमुग्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून चतुरंग राग 2021 या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले. ’चतुरंग गावो गुनी सब मिलकर’ या घोषवाक्याने नटलेला हा कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमात मधुवंती, बिहाग, बागेश्री, सोहनी अशा रागांतील, बडा ख्याल, …
Read More »‘सीकेटी’त विद्यार्थ्यांचे स्वागत;कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना या जागतिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले 10 महिने बंद असलेले, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 1) नव्या उत्साहाने, विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्य इंदू घरत …
Read More »भाजप दक्षिण भारत सेल खारघर-तळोजा मंडलच्या सदस्यांना नियुक्तिपत्रे
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारत सेल खारघर-तळोजा मंडल समितीच्या सदस्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. भाजप खारघर तळोजा मंडळाच्या कार्यालयात हा नियुक्तिपत्रे देण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. 31) झाला. भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच उत्तर रायगड जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडुरू यांच्या उपस्थितीत सदस्यांना नेमणूकपत्रे देण्यात …
Read More »आशयपूर्ण एकांकिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने! तुफान प्रतिसादाने स्पर्धा हाऊसफुल्ल
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या तिसर्या व अंतिम दिवशीही रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद …
Read More »‘दिशा’तर्फे हळदी-कुंकू समारंभात मार्गदर्शनाचा वाण
पनवेल : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंचच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे शनिवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. ’ती’च्या नजरेतून हा उपक्रम या वेळी राबविण्यात आला. कामोठे येथील नालंदा बुद्धविहार येथे झालेल्या या समारंभात उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकवाची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper