मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील मोहोपाडा येथून संकष्टी चतुर्थी निमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त रसायनी परीसरातील वारकरी संप्रदायाने …
Read More »उरण येथील मोरा कोळीवाडा ते कार्ला पालखी उत्सव
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील मोरा कोळीवाडा येथील साई माऊली मित्र मंडळाच्या वतीने मोरा कोळीवाडा ते कार्ला (एकविरा) पालखी उत्सव नुकताच झाला. मोरा येथील साईबाबा मंदिर येथे सर्व कोळी बांधवांनी देवीची पूजा केली व पालखीला सुरुवात झाली. पुढे कार्ला (एकविरा) येथे पालखी पोहचल्यानंतर आरती करण्यात आली. या सोहळ्यास साई माऊली …
Read More »पनवेल येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्त आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात होत आहेत. रस्ता सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत, 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमामध्ये शुक्रवारी (दि. 29) पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे …
Read More »पनवेल मनपातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण’
पनवेल ः प्रतिनिधीस्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेने शून्य कचरा मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी एक वाहन तयार करण्यात आले असून, यात जुने कपडे, भांडी, प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यात येणार आहेत. या वाहनाचे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिकांस दुसर्या दिवशीही उदंड प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तशहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेस शनिवारी (दि. 30) दुसर्या दिवशीही रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या दुसर्या दिवशी वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), जाळ्यातील खिळे …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण
नाट्य-सिने क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. …
Read More »पनवेल तालुका पोलिसांनी केले मनोरूग्ण व्यक्तीस कुटूंबीयांकडे सुपूर्द
पनवेल : वार्ताहर मनोरूग्ण इसमाला अथक प्रयत्न करून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केल्याने या व्यक्तीच्या नातेवाइकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक व आभार मानले आहेत. रिटघर येथील पोलीस पाटील दीपक पाटील यांनी मोबाइल फोनद्वारे कळविले की, एक अनोळखी व्यक्ती रिटघर गावात जाणार्या रस्त्यावर फिरत …
Read More »कोण मारणार बाजी? महाराष्ट्राला उत्सुकता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमध्ये सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा विजेता कोण होणार याची प्रतीक्षा रविवारी (दि. 31) संपणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार? आणि एक लाख रुपयांसह मानाचा अटल करंडक कोण पटकाविणार याची उत्सुकता राज्यातील रसिक प्रेक्षकांना लागली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत …
Read More »नवीन पनवेल येथे स्वच्छता मोहिमेद्वारा पथनाट्य
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल या स्वच्छता अभियान मोहिमेद्वारा नवीन पनवेल सेक्टर 04, द्वारका स्विट मार्ट समोर आपले घर, आपल्या घरासभोवतालचा परिसर व आपले पनवेल शहर कशाप्रकारे स्वच्छ व सुंदर ठेवावे. याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यासाठी एक पथनाट्य सादर करण्यात आले. हे पथनाट्य ठाणे येथील …
Read More »उरणमध्ये तनिष्क ज्वेलरीचे प्रदर्शन
उरण : वार्ताहर उरणमध्ये प्रथमच तनिष्क ज्वेलर्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्वेलरी ब्रँडचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 29, 30, 31 जानेवारीदरम्यान असलेले हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उरण येथील आनंदी हॉटेल येथे खुले आहे. तनिष्कचे नामांत कीत अतिशय सुंदर आणि सुबक सोन्याचे दागिने 18 कॉरेट 22 कॉरेटचे दागिने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper