Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पाणी आणि विजेची चोरी करणार्‍यास अटक; तिघांचा शोध सुरू

पनवेल : वार्ताहर खारघर भागात पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या सिडकोच्या पाइपलाइनला अनधिकृतरीत्या जोडणी करून तसेच महावितरणची वीज चोरी करून त्या माध्यमातून सिडकोच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीररीत्या वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरू करणार्‍या चौकडीवर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यापैकी एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पंप मशिन, वॅक्युम मशिन, ब्लोअर मशिन व …

Read More »

भरमसाठ पाणी बिलास कळंबोलीकरांचा विरोध; वाढीव दर रद्द करण्याची सिडकोकडे मागणी

पनवेल : वार्ताहर सिडको वसाहतीत पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली होती. कोरोना काळात पाठवलेल्या सुधारित देयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे सिडकोने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती, परंतु आता ग्राहकांना सुधारित दरानुसार पाणी देयके पाठवण्यात आली आहेत. ही रक्कम जास्त असल्याने कळंबोलीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त करून विरोध दर्शविला आहे. …

Read More »

आकुर्ली येथे ‘एक दिवा शहिदांसाठी’

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनासारख्या एका अदृश्य शत्रूने संपूर्ण जगाला वेठीस धरले. या वेळी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदींनी या कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची बाजी लावली. या लढाईत जे कोरोना योद्धे शहीद झाले त्यांच्यासाठी शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने अपेक्षा कॉम्प्लेक्स आकुर्ली येथे एक दिवा शहिदांसाठी या …

Read More »

भाजप उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर यांनी दिले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण व्यापारी असोसिएशनचे संयोजक हितेश शाह, उपाध्यक्ष मनोहर सहतीया, सेक्रेटरी हस्तीमल …

Read More »

अवकाळी पाऊस वीटभट्ट्यांच्याही मुळावर

व्यावसायिक संकटात; राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी मोहोपाडा : प्रतिनिधी डिसेंबर महिन्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचा कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या आर्थिक संकटात असलेल्या वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी वीटभट्टी मालक राज्य शासनाकडे मागणी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सन 2018-19मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

धर्मशाळेस आर्थिक मदत; रुग्णांना चादर वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त ओवा गाव येथील संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेच्या माध्यामतून सुनिल पाटील हे परिसरातील येणार्‍या अवे कॅन्सर रुग्नांची मनोभावे सेवा करत आहे. त्याअनुसंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या धर्मशाळेस भेट देऊन त्यांनी येथील रुग्णांना त्यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आले. तसेच या वेळी …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात विकासकामांचा झंझावात

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः प्रतिनिधीभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे होऊन पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. विभागात सर्वत्र विकासकामांचा झंझावात सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील शहरांसह गावांचाही …

Read More »

मोहोपाड्यातील सीसीटीव्ही पूर्ववत; ‘रामप्रहर’च्या वृत्ताची दखल

मोहोपाडा : प्रतिनिधी दैनिक रामप्रहरमध्ये सोमवार (दि.14)च्या अंकात मोहोपाड्यातील सीसीटीव्ही दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याअगोदर प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते यावर चर्चा केली होती. ‘रामप्रहर’मध्ये वृत्त प्रसिध्द झालेल्या …

Read More »

खारघरमधील मैदाने खुली करा

नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली सार्वजनिक ठिकाणे खुली केली आहेत. त्यानुसार खारघर शहरातील जागतिक पातळीवर ओळख असेलले सेंट्रल पार्क मैदानदेखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी  पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली …

Read More »