Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

भाजप किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध मंडलाच्या अध्यक्षपदी पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) नियुक्तिपत्र देण्यात आले. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला …

Read More »

भाजप नेते संदीप पाटील यांच्या दणक्याने सिडको प्रशासन वठणीवर

पनवेल : वार्ताहर भाजप नेते व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या दणक्याने  सिडको प्रशासन वठणीवर आले आहे. गटारांचे रुंदीकरण व सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांचे विस्तारीकरण कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन सिडकोने दिले आहे. संदीप पाटील यांनी यासंदर्भात सिडकोच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. सिडको प्रशासनाच्या …

Read More »

जासई विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन, महिला मुक्ती दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, गाव अध्यक्ष सल्लागार समितीचे सदस्य यशवंत …

Read More »

‘सावित्रीबाई फुलेंमुळेच स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला’

पनवेल : प्रतिनिधी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज अनेक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केले. रविवारी (दि. 3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते मनोगत व्यक्त करीत होते. महाराष्ट्र …

Read More »

शेकाप, काँग्रेसच्या पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत शेकाप व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन या पदाधिकार्‍यांचे पक्षात …

Read More »

मनोरंजन अनलॉक @ पनवेलच्या यशस्वी आयोजनानंतर ‘पुन्हा सही रे सही’

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने नुकताच मनोरंजन अनलॉक @ पनवेल या संगीत, नृत्य व नाटकाच्या मेजवानीचा यशस्वी कार्यक्रम झाला. या नंतर प्रथमच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांचा पुन्हा सही रे सही या नाटकाचा लॉकडाऊननंतर पहिला प्रयोग शनिवारी (दि. 2) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …

Read More »

उरणमधील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 236 अर्ज वैध

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ग्रामपंचायतिचे बिगुल वाजले असून सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 247 निवडणूक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 236 अर्ज वैध झाले असून 11 अर्ज अवैध आले आहेत. उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, फुंडे, वेश्वी अशा ग्रामपंचायतची निवडणूक आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी …

Read More »

माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ

उरण : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्यात राबविले जात आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषद यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता उरण नगरपरिषदेच्या प्रारंगणात करण्यात आले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू …

Read More »

भाजी विक्रेत्यांना लुबाडणार्या शेकापच्या नेत्यांची भाजपकडून पोलखोल

कळंबोलीच्या मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 5 परिसरात असलेल्या भाजी मार्केटमधील आर्थिक हव्यासापोटी सुरू असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची पोलखोल भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे या भाजी मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल करण्याचा प्रयत्न लवकरच उध्वस्त होणार आहे. कळंबोलीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नावावर सत्तेचा गैरवापर करून या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन

मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत ज्येष्ठ समाजसेवक के. पी. पाटील यांनी सुरू केलेल्या बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील व्यक्ती उपस्थित होत्या. रसायनी पाताळगंगा परीसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील नागरिक लग्न व इतर समारंभासाठी पनवेल, कर्जत आदी ठिकाणी भाड्याने हॉल …

Read More »