Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

विद्यार्थ्यांवरील अमानूष मारहाणीचा जाहीर निषेध -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भरातील विद्यार्थी परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोना मुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अशा रास्त मागण्या करत आहेत. धुळे येथे याच मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार …

Read More »

रायगडात 489 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) 489 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू  झाला. दुसरीकडे 393 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन, खालापूर दोन तसेच पेण, अलिबाग, सुधागड, महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल …

Read More »

पनवेल तालुक्यात 252 कोरोनाबाधित; पाच रुग्णांचा मृत्यू; 209 जणांची संसर्गावर मात

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 26) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 190 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले …

Read More »

करळ-सावरखारचे उपसरपंच प्रवीण घरत यांचा भाजपत प्रवेश

उरण ः वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत करळ-सावरखारचे विद्यमान उपसरपंच प्रवीण गजानन घरत यांनी बुधवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी प्रवीण घरत यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी त्यांचे …

Read More »

कळंबोलीतील ज्येष्ठ नागरिक संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

कळंबोली ः रामप्रहर वृत्त  कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त …

Read More »

घराघरांमध्ये गौराईचे मनोभावे पूजन

पनवेल : बातमीदार गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर वाजतगाजत जल्लोषात पनवेलच्या घराघरांमध्ये गौरीचे आगमन झाले. माहेरवाशीण असलेल्या गौरीच्या आगमनानंतर घरामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. राज्यात बर्‍याच ठिकाणी उभ्या गौरी बसवण्याची प्रथा आहे. नवीन खण-साडी, बांगड्या, पैंजण, बोरमाळ, चपला हार, नथ, कमरपट्टा, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, चपलाहार असे पारंपरिक दागिने, शेवंतीची वेणी व …

Read More »

अटकेतील आरोपींना कोरोना

पनवेल ः बातमीदार एनआरआय पोलिसांनी नुकतेच चोरीच्या गुन्ह्यात चार जणांना अटक केली. यापैकी तिघे आरोपी कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पकडून आणणार्‍या तपास पथकातील पोलिसांचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे. संजय अपुणे, प्रताप लोमटे-पाटील, दत्ता कांबळे आणि रोशन कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 16 ऑगस्ट रोजी …

Read More »

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ

पनवेल ः बातमीदार कोरोनाचा प्रसार अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे शाळा केव्हा सुरू होणार याची काही शाश्वती नाही. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांला आपले कुटुंब कसे चालवावे, हा यक्षप्रश्न पडला आहे. राज्य सरकारने मार्ग काढून विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांसाठी काहीतरी योजना आखावी, अशी मागणी विद्यार्थी वाहतूक करणार्‍या संघटनेने केली आहे. …

Read More »

कोरोना काळात फुलांचे दर दुप्पट; भक्तांच्या खिशाला कात्री

पनवेल : बातमीदार गणेशोत्सव म्हटला की, विघ्नहर्त्यांला हार-फुले ही लागणारच. मात्र यंदा प्रथमच हार, फुले महाग झाली आहेत. फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. यामुळे भक्तांच्या खिशाला यंदा हार, फुलांसाठी मोठी कात्री बसत आहे. मागील वर्षीपेक्षा दर दुप्पट झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकर्‍यांनी यावर्षी फुलशेती करताना आखडता …

Read More »

भाजपकडून मदतीचा ओघ सुरूच; पनवेल परिसरातील गावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिघाटी, करंजाडे, …

Read More »