Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

अल्पवयीन मुलाला लुटणार्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पनवेल : वार्ताहर, बातमीदार खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा प्रकार घडला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचा कक्ष क्रमांक दोनच्या पथकाने दोन दिवसांत हा गुन्हा अत्यंत शिताफीने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांनी इतर गुन्ह्यांची ही कबुली दिली. 10 सप्टेंबर रोजी रोजी …

Read More »

कासाडी नदीत सोडलेल्या रसायनांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य

नागरिकांना श्वसनाचा त्रास; तक्रारींकडे दुर्लक्ष कळंबोली : रामप्रहर वृत्त तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही …

Read More »

रायगडात 893 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 12) कोरोनाचे 893 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 659 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन तसेच खालापूर व अलिबाग येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण …

Read More »

पनवेल पालिका हद्दीतील पत्रकारांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रातील  पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट शनिवारी (दि.12) पनवेल पालिका मुख्यालयात करण्यात आली. तरी सर्व पत्रकार बंधु आणि भगिनींनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले होते. या आव्हानाला पालिका क्षेत्रातील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद देत 27 पत्रकारांनी स्वत:ची …

Read More »

पनवेल तालुक्यात 429 रुग्णांचा नवा उच्चांक

आठ जणांचा मृत्यू    333 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शनिवारी (दि.12) कोरोनाचे 429 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 291 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 227 …

Read More »

भाजपतर्फे सेवा सप्ताह अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना महासाथीचा मुकाबला करताना ’संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य भाजपचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोनासंबंधित सर्व …

Read More »

फेरीवाल्यांना मिळणार ‘पंतप्रधान स्वनिधी’चा लाभ

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशातील ग्रामीण आणि शहरी भागातील फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2020 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान स्वनिधी योजना जाहीर केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »

अंगदुखीला करा बाय बाय

दिवसभराच्या ताणतणावपूर्ण कामांमुळे अनेकांना अंगदुखी अथवा शरीराच्या काही भागात तीव्र वेदना होण्याचा त्रास होत असतो. साधारणतः अशा वेदनांमुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे असते. यावर उपाय म्हणून वारंवार वेदनाशामक औषधे घेण्याचेदेखील शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अंगदुखीवर वेदनाशामक औषधांचा वापर करण्याऐवजी आयुर्वेदात सांगितलेले …

Read More »