पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात तब्बल 535 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी (दि. 20) झाली. त्याचबरोबर 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 267, पेण 43, अलिबाग 41, माणगाव 38, रोहा व महाड प्रत्येकी 31, खालापूर 24, कर्जत 22, उरण 16, …
Read More »पळून गेलेल्या मुलीवर बलात्कार
पनवेल : बॉयफ्रेन्डसोबत पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,17 वर्षीय मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. या मुलीला खारघरमधील फ्लॅटमध्ये नेले होते. तिथे तिला पावडर म्हणून ड्रग्ज देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सध्या तिचे समुपदेशन केले जात आहे. …
Read More »भक्तांकडून लहान गणेशमूर्तींना प्राधान्य
पनवेल : बातमीदार कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सव करणारे आणि सार्वजनिक मंडळांनीही यंदा कमी उंचीच्या गणेश मूर्ती स्थापन करण्यास पसंती दिली आहे. गणेशभक्त यंदा सहज विरघळणार्या शाडू मातीच्या आणि लहान मूर्तींचा आग्रह धरत असल्याची माहिती येथील मूर्तिकार यांनी …
Read More »कोरळवाडी आदिवासीवाडीतील प्रश्न मार्गी लागण्याची आशा
पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वाडीतील रस्ता पाणी आणि शिक्षणाचा प्रश्न कायमचा सुटणार या आशेने कोरलवाडीतील आदिवासींनी आपले पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करून प्रशासनाचे आभार मानले. गेल्या काही महिन्यापासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर या वाडीला मूलभूत सुविधा पुरवून देण्यासाठी जागतिक आदिवासी दिनापासून बेमुदत आमरण …
Read More »शिवाजीनगर येथे अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये गव्हाण येथील शिवाजीनगर येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी …
Read More »जान्वी टेलिकॉम नवीन मोबाइलचे दालन सुरु
पनवेल : मिडल क्लास सोसायटी येथे सोनी बंधूंनी जान्वी टेलिकॉम हे नवीन मोबाइलचे दालन सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक राजू सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पवन सोनी यांच्यासह व्यापारी बांधव व समाज बांधव उपस्थित होते.
Read More »नाल्यांना संरक्षक जाळी बसवण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनी परिसरातील परिसराला लागून असलेल्या नाल्यांना संरक्षण जाळी बसवुन पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवरील तुटलेली झाकणे बदलण्यात यावी, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. खांदा कॉलनी परिसरातील सेक्टर 7 आणि नव्या विभागांना लागून तसेच सेक्टर 5 वसाहत यांच्यामध्ये मोठे नाले …
Read More »गणपतीची पूजाही यंदा ऑनलाइन
पुरोहित करणार फेसबुक, झूम माध्यमांचा वापर पनवेल : बातमीदारकोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रतिबंधित क्षेत्र विचारात घेऊन शहरांतील काही पुरोहितांनी फेसबुक, झूम आदी तंत्रस्नेही माध्यमांद्वारे गणपतीची भाविकांना यथासांग पूजा सांगण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरांतील अनेक पुरोहित गणेशोत्सवात गणेशपूजनासाठी नियमित भक्तांच्या घरगुती, सार्वजनिक गणपतींच्या प्रतिष्ठापना करून देतात. काही पुरोहित मुंबई, नवी मुंबईस अन्य …
Read More »ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची क्वारंटाइन सेंटरमध्ये आत्महत्या
खारघर, पनवेल ः बातमीदारखारघरमध्ये क्वारंटाइन असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेतला. गेल्या काही महिन्यांतील आरोपींच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी खारघरच्या गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष …
Read More »विसपुते महाविद्यालयात वेबिनारला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचा 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोरोना महामारीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झूम अॅप व फेसबुक च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत- युवा महासंवाद 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिंदखेडा विधासभेचे आमदार जयकुमार रावळ, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, महेंद्र विसपुते व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper