Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

अंगणवाडी, आशा सेविकांचे कोरोना युद्धात महत्त्वाचे योगदान

उरण : वार्ताहर कोरोना युद्धात अंगणवाडी सेविका व आशा सेविका महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. अल्प मानधनात काम करणारा हा घटक कोरोना सर्व्हेमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करत आहे. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशा सेविका घरातील प्रत्येक सदस्याचा सर्व्हे व थर्मल स्क्रिनिंग करत आहेत. तसेच जनजागृतीचे कामही करत आहेत. …

Read More »

जासई भागातील शेतकर्यांना थेट बांधावर मिळणार कृषिसेवा

चिरनेर : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना सर्व कृषिसेवा थेट बांधावरच देण्याचा उपक्रम शासनाच्या उरण तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला आहे. यामध्ये जासई विभागातील चिरले, जांभुळपाडा, गावठाण या गावांमधील शेतकर्‍यांना खते व भातबियाणे थेट शेताच्या बांधावरच देण्यासाठी उरणचे कृषी सहाय्यक अधिकारी डी. टी. केणी यांनी प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी जाऊन …

Read More »

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपिठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक अंतर्गत मारूती मंदिर नवीन पनवेल केंद्राच्या युवा प्रबोधन विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन पनवेल शहरातील श्री साई ब्लड बँक येथे करण्यात आले होते. त्याला स्वामी सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाने लावलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वामी सेवकांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून वूमन्स प्रेस ऑर्गनायझेशनला मदत

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील पत्रकारितेत कार्यरत असणार्‍या महिला पत्रकारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतही केली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या या लढाईत 31 मेपर्यंत सर्व जनता लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनची परिस्थिती आणखी किती दिवस राहील याबद्दल साशंकता आहे. अशातच …

Read More »

तळीरामांचा मोर्चा रसायनी, पेणकडे

रेड झोनमधील मद्यप्रेमींची वाइन शॉपवर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पनवेल : वार्ताहर कोरोना साथीचा आजार संपूर्ण देशभरात थैमान घालत असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन येत्या 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच नुकतेच दारूची दुकाने काही ठिकाणी सुरु केल्याने तळीरामांची प्रचंड गर्दी वाइन …

Read More »

नवघर गावात शिरले उधाणाचे पाणी

उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांत नाराजी उरण : रामप्रहर वृत्त – नवघर गावात समुद्राच्या उधाणाचे पाणी वारंवार घुसून याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सूर निघत आहे. ग्रामपंचायत नवघरमधील नवघर गावामध्ये उधानाचे पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. यामुळे गावातील लोकांच्या घरामध्ये व घराबाहेर पाणी येऊन …

Read More »

चिर्ले खाडीत करकोचा पक्ष्याला जीवदान

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले येथील खाडीच्या उथळ पाण्यातील भक्ष पकडण्यासाठी असलेल्या लांब चोचीच्या करकोचा नावाच्या पक्ष्याला खाडीच्या कडेला पाण्यात भिजून आजारी अवस्थेत आढळून आला असता, त्याला अन्य वन्यजीव मित्रांच्या मदतीने निसर्ग वन्यजीव संस्थेचे आनंद मढवी यांनीअलगद उचलून  बाहेर काढले. त्याला पशुसंवर्धन रुग्णालयात उपचार करून पुन्हा मोकळेपणाने संचार …

Read More »

नवीन पनवेलमध्ये गरिबांना अन्नधान्याचे वितरण

पनवेल : वार्ताहर – कोरोना साथीचा आजार हा संपूर्ण जगामध्ये थैमान घालत आहे. हा रोग पसरू नये यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या व दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे बंद पडून काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पनवेलमधील श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोसिएशन हि संस्था आजपर्यंत स्वखर्चाने शक्य …

Read More »

उरण येथून 92 जणांना घेऊन उत्तर प्रदेशला जाणार्या ट्रकवर कारवाई

उरण : प्रतिनिधी  – कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, राज्यात विविध ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने परराज्यातील मजूरांनी या संसर्गजन्य विषाणू फैलावाच्या भितीने व त्यांना  सध्या काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारी कोसळल्याने त्यांनी त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारे वाहनांची व्यवस्था नसल्याने एका ट्रकमध्ये 92 व्यक्तींना …

Read More »

पनवेल तालुक्यातील सहा ठिकाणे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र जाहीर

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील विचुंबे, उलवे, करंजाडे नोड, सुकापूर, आकुर्ली, उसर्लीखुर्द या सहा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने येथील इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंन्टेमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. यामध्ये विचुंबे येथील सर्व्हे नं.143/1, विचुंबे येथील …

Read More »