Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

खारघर : श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण महापूजेचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी दर्शन घेतले. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेता नितेश पाटील उपस्थित होते.

Read More »

करंजाडे येथे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा करंजाडे शहर यांच्या वतीने शुक्रवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे सेक्टर 5 मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजश्री साबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली …

Read More »

पनवेल महापालिकेकडून अडीच टन प्लास्टिक जप्त

सव्वा दोन लाखांचा दंड वसूल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर शनिवारी (दि. 1) सकाळी 6.00 वाजल्यापासून अचानक धाडी घालुन सुमारे 2.5 टन प्लास्टिक जप्त केले. तसेच दोन लाख 25 हजार रूपयांचा दंड वसूल केला.  या प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये पिशव्या व प्लास्टिकच्या वस्तू आढळून …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विशेष मोहीम

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन मार्गिका असून त्यापैकी प्रवाशी बसेस, जड अवजड वाहने डाव्या मार्गीकेमधून न जाता उजव्या मार्गीकेमधून मार्गक्रमण करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतात. त्यामुळे अपघात सत्र वाढते. हे सर्व टाळण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांनी संयुक्तपणे …

Read More »

गुळसुंदे विद्यालयात माता-पालक मेळावा साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे विद्यालयात विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. विद्यालयात पालकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी विद्यालयाच्या मदतीने महिला पालक मेळाव्याचे आयोजन शुकवारी (दि. 31) केले होते. यामध्ये प्रायमा मेडिकल संस्थेच्या …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. 18 मधील विकासकामांना वेग

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र.18चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र.18 मधील विकासकामे जोरदारपणे सुरू आहेत.  प्रभाग क्र.18 मधील बिरमोळे हॉस्पिटल ते वरद विनायक सोसायटी परिसर याठिकाणी असलेली रस्त्याची कामे, तसेच गटारे, नाल्याची कामे जी पूर्वीच मंजूर करून घेतली होती ती आता जोरदारपणे सुरू झाली …

Read More »

नवी मुंबई विमानतळासाठी ‘एसबीआय’कडून वित्तपुरवठा

पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळ प्रकल्प उभारणार्‍या जीव्हीके पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रा कंपनीला 16 हजार कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यास एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पातील धावपट्टी व टर्मिनल्स एल अ‍ॅण्ड टी कंपनी करणार असल्याने सर्व सोपस्कर पूर्ण होईपर्यंत सहा …

Read More »

‘ते’ फलक सुधारले

पनवेल भाजप युवा मोर्चाची तत्परता पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते पनवेल शहराला जोडण्याकरिता पोदी येथे नव्याने भुयारी मार्ग सुरु करण्यात आला आहे. परंतु मार्गावर जुना पनवेल हे नामफलक लावण्यात आले असून, भारतीय जनता पार्टी युवामोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 1) याचा निषेध करीत पनवेल असा उल्लेख असलेले नामफलक लावले. …

Read More »

‘घारापुरी’च्या स्वच्छतेसाठी ओएनजीसीकडून निधी, घंटागाडीसह 500 कचरा कुंड्या बेटावर दाखल

उरण : प्रतिनिधी जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्‍यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीतून घंटा गाडी आणि 500 कचरा कुंड्या बेटावर दाखल झाल्या आहेत.  क्रेन, हायड्राचा वापर करून अखेर बोटीने समुद्रापार करीत मोठ्या प्रयासाने स्वच्छतेची सामुग्री बेटावर पोहचविण्यात यश आले आहे. …

Read More »

पनवेलमध्ये रस्त्यावरील झाडांची कत्तल

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावरील झाडांची गुरुवारी (दि. 30) रात्री अज्ञात व्यक्तीनी कटरने अमानुष कत्तल केल्याबद्दल अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 मधील विचुंबे रस्त्यावरील प्रजापती बिल्डिंगच्यासमोर पदपथावर दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंपळ, …

Read More »