Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात उरणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन

तालुकाध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी उरण : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) उरण तहसील कार्यालयावर उरण भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास …

Read More »

निष्क्रिय राज्य सरकारविरोधात आज भाजपचे धरणे आंदोलन

पनवेल : शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या आणि महिलांविरुद्ध वाढते अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) भाजपने राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे. त्यानुसार पनवेल भाजपच्या वतीनेही तहसील कार्यालयावर सकाळी 10 वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

पनवेलमध्ये विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तशहरातील गावदेवी पाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक जगदिश गायकर, …

Read More »

उरणच्या रुद्राक्षीचा नवा पराक्रम; घारापुरी-गेट अंतर पोहून केले पार

उरण ः रामप्रहर वृत्तउरणमध्ये वास्तव्यास असणारी मूळची अलिबाग शहाबाज येथील नऊ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवनवीन पराक्रम करीत आहे. रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमी अंतर पोहून पार केल्यानंतर तिने घारापुरी (एलिफंटा) ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमी अंतर निर्धारित उद्दिष्टापेक्षा …

Read More »

पनवेलमध्ये आरोग्य शिबिराला प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी : पनवेलमध्ये रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला 650 नागरिकांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली. पनवेलमधील 52 बंगलो येथे जनजागृती ग्राहक मंच, पनवेल तालुका निवृत सेवक संघ, अंकुल फाऊंडेशन मोरबे आणि वेदिक आयूर क्युयर हेल्थ आणि रिटेल्स प्रा. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा – अॅड. नागेश जायभाय

उरण : वार्ताहर : केवळ शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन त्यांचे विचार समाजात रुजणार नाहीत तर स्वतःमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहावे लागेल, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अहमदनगर येथील अ‍ॅड. नागेश जायभाय यांनी व्यक्त केले, ते रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान …

Read More »

नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे दुर्घटनेची शक्यता

पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे नागरिक आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही महावितरणच्या अधिकार्‍यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नवीन पनवेल मधील सेक्टर 12 मधील रस्ता नं. 11 वरील प्लॉट नं. 14 जवळ रस्त्याला लागून महावितरणचा डीपी आहे. या …

Read More »

चिरनेर येथे 30 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर : उरण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चिरनेर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे सेकंडरी स्कूल चिरनेर या शाळेतील 1990 साली एसएससीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 30 वर्षांनंतर चिरनेर येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी कृष्णा सोमा केणी यांच्या पुरणशेत येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात …

Read More »

मोबाइल चोरणार्या दुकलीला अटक

पनवेल : वार्ताहर : पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरींच्या घटनांत वाढ झाली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच त्यांचा एक आरोपी फरार झाला आहे …

Read More »

औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल; रोटरी क्लबचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्र व पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती क्षेत्रात औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल असा प्रकल्प डॉ. गिरीष गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून त्याची प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आली.  एक चमचा कमी चार पावलं पुढे! …

Read More »