Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल, उरण तालुक्यांत सर्वत्र कडकडीत बंद

जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : वार्ताहर शासनाने जाहीर केलेल्या रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सर्वत्र निरव शांतता व शुकशुकाट होता. बंद असतानाही अतिशहाणपणा करून रस्त्यावर उतरणार्‍या अविचारी नागरिकांना चांगलाच पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी …

Read More »

जनता कर्फ्यूत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : कोरोनाविरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, तसेच सर्वांनी मनात भीती न बाळगता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन …

Read More »

कामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

बाहेर फिरताना आढळल्याने कारवाई पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील ज्या सदस्यांना होम क्वारंटाईन केले होते ते शनिवारी (दि. 21) सकाळी महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या तपासणीवेळी बाहेर फिरताना आढळले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना खारघर येथील ग्राम विकास भवनात 14 दिवसांसाठी पुन्हा …

Read More »

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेलमध्ये जंतूनाशकांची फवारणी

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेतर्फे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार मनपा हद्दीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जंतूनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. एकूण आठ पथके फवारणीचे काम करीत आहेत.सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने जंतूनाशकांची फवारणी करावी, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी (दि. …

Read More »

नळजोडणीधारकांसाठी सुधारित दर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळजोडण्यांकरिता आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या गावांकरिता फेब्रुवारी-मार्च 2020च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात येणार आहेत. सिडकोच्या हद्दीतील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे, द्रोणागिरी या नोडमधील …

Read More »

कळंबोलीत कोरोनाविरोधात नगरसेवकाचा लढा

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्यातर्फे जनजागृती पनवेल : वार्ताहर कोरोना या महाभयंकर व्हायरसच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे. या महामारी रोगाविरोधात अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि व्यक्ती उतरले आहेत. पनवेल मनपाचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनीही कंबर कसली आहे. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती आणि प्रबोधन सुरू केले आहे. कळंबोलीत महत्त्वाच्या ठिकाणी …

Read More »

खारघरमध्ये मोफत मास्कवाटप

खारघर : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूपासून होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सॅनिटायझर व मास्कची आवश्यकता आहे व बाजारात या मास्कचा तुटवडा असून जे आहेत ते चढ्या भावाने विकले जात आहेत. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने खारघर-तळोजा मंडल उद्योग आघाडीच्या वतीने खारघर रेल्वेस्टेशनच्या प्रवाशांना 300 मास्कचे मोफत …

Read More »

कोरोना रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार

रेशनिंग दुकानात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे, कळंबोली आणि खारघर मंडलच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने रेशनिंग दुकानात फेस मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी …

Read More »

आजपासून पनवेल बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय; अत्यावश्यक सेवांना वगळले पनवेल ः प्रतिनिधीकोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने परसत आहे. त्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे …

Read More »

पनवेल महापालिकेतर्फे डॉक्टर प्रतिनिधींची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गाबद्दल रुग्णांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. कोरोनाच्या संदर्भात रुग्णामध्ये वाढत्या अफवांवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निवडक डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकतीच बैठक घेतली. कोरोना या आजाराबद्दल सध्याच्या घडीला नागरिकांमध्ये गैरसमज आहे. त्याचा फैलाव लागण याबाबत सर्वानीच सतर्क राहणे गरजेचे आहे. …

Read More »