Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

12व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

पनवेल : बातमीदार कळंबोली सेक्टर 11मध्ये रहाणार्‍या 19 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीने खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. गुरुशरणजीत कौर जोगासिंग भुल्लर (19) असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त …

Read More »

भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड करण्यात आली. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार -डॉ. कविता चौतमोल

पनवेलच्या महापौर, उपमहापौरांनी स्वीकारला पदभार पनवेल : प्रतिनिधीमहिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्याचा आणि त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला विक्रीसाठी महापालिका हद्दीत केंद्र उभारण्याला प्राधान्य देणार असल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिकेच्या सलग दुसर्‍या टर्ममध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यावर त्या बोलत होत्या.पनवेलच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल आणि …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल : भाजप उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे जि.प. सदस्य अमित जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हजरत शेख मिठेशावली उरुस आपटा (ता. पनवेल) : हजरत शेख मिठेशावली उरुसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी दर्ग्यात जाऊन चादर …

Read More »

समूह गीतगायन स्पर्धेत सीकेटी विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण आगरी समाज मंडळातर्फे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त आयोजित समूह गीतगायन स्पर्धेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रोख रक्कम 3000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे, तसेच खुल्या गटात …

Read More »

शिवसेनेचे नाव ठाकरे सेना करा

उदयनराजेंचे टीकास्त्र; सोयीचे राजकारण करीत असल्याचा आरोप मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते व सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, असे बोल सुनावत उदयनराजेंनी शिवसेनेवर पलटवार …

Read More »

सोनारी येथे विविध उपक्रम

उरण : वार्ताहर कै. रामा पुना कडू यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा रवींद्र कडू व सून वनिता कडू यांनी सोनारी येथील वैकुंठभूमी (स्मशानभूमी)जवळ लाकडे ठेवण्यासाठी स्वखर्चाने एक रूम बांधली असून, ती ग्रामसुधारणा मंडळाकडे नुकतीच हस्तांतरित केली. या कार्यक्रमास माजी सरपंच महेश कडू, ग्रामसुधारणा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश तांडेल, माजी अध्यक्ष हरिभाऊ …

Read More »

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत मकरसंक्रांतीचा गोडवा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या एसएससी 1989मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. 12) शांतीवन नेरे येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसमवेत मकरसंक्रांतीच्या तिळाचा गोडवा हा सदाबहार कार्यक्रम साजरा केला. सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या हेतूने या गु्रपची स्थापना केली गेली …

Read More »

आरोग्य शिबिरास नवघरमध्ये प्रतिसाद

उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरण व ग्रामपंचायत नवघर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 280 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. संतोष गाडे, डॉ. प्रिती गाडे, डॉ. चेतन पाटील, डॉ. …

Read More »

सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी संघटनेच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सिडको भवन येथे सोमवारी (दि. 13) झाले. या वेळी बोलताना त्यांंनी नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांशी …

Read More »