तहसीलवर एकदिवसीय लाक्षणिक संप पनवेल : बातमीदार पनवेल येथील सरकारी कर्मचार्यांतर्फे राज्य सरकारविरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या वेळी अनेक राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्यांना लागू करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित …
Read More »पनवेलमध्ये भरणार रायगड सरस प्रदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या रायगड सरस या प्रदर्शनाचे आयोजन पनवेल मध्ये गुरुवार (दि. 9) ते सोमवार (दि. 13) या दरम्यान पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराथी शाळेच्या मैदानामध्ये केले आहे. या प्रदर्शनामध्ये स्वयं सहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनातील खास आकर्षण …
Read More »पनवेल पालिका हद्दीतील बेवारस वाहनांवर कारवाई
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील पदपथ व रस्ते यावर अनधिकृतपणे दुरूस्त होत असलेली वाहने, पडीक, बेवारस वाहनांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 230 व अनुषंगीक कलमान्वये कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी झालेल्या ठरावानुसार एकुण 693 बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते अलविदा डायबिटीज डायटचे माहितीपत्रक सादर
पनवेल : नील हॉस्पिटल येथे बार असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते अलविदा डायबिटीज डायटचे माहितीपत्रक सादर करण्यात आले. या वेळी बीके डॉ. शुभदा नील, रिपोर्टर अनिता चौहान, योगा टीचर गुप्ता मॅडम, प्रभा सिन्हा, मा. शिक्षण अधिकारी सुरेश जाधव, किशोर मोरे, वंदना नील, बीके रेहना उपस्थित होते.
Read More »वाहनचालकांवर कळंबोली पोलिसांची कारवाई
पनवेल : बातमीदार कळंबोली पोलिसांनी ई-चलन मशिनद्वारे 2019 या वर्षामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 6,792 वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 22 लाख 82 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत विनाहेल्मेट, ट्रीपल सीट नेणार्या वाहनचालकांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेशिस्त वाहनचालकांमुळे रस्ते …
Read More »खवल्या मांजराची विक्री करणार्यास अटक
पनवेल : बातमीदार, वार्ताहर दुर्मीळ अशा वन्यप्राणी खवल्या जातीच्या मांजराची तस्करी व विक्री करणार्या व्यक्तीस खांदेश्वर पोलिसांनी गाडीसह अटक केली आहे. वन्यप्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम आसूडगाव बसस्टॉपजवळ येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांना मिळताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुळबा ढाकणे, पोलीस …
Read More »‘पोस्को’ प्रकरणातील मुलगी बेपत्ता
पनवेल : बातमीदार पुणे येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर दाखल झालेल्या ’पोस्को’ गुन्हा प्रकरणास गंभीर वळण लागले आहे. मोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार करणारी अल्पवयीन बालिका घरातून बेपत्ता झाली असून, ’माझा शोध घेऊ नका, माझ्या मृत्यूला निशिकांत मोरे जबाबदार असतील,’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी तिच्या घरी …
Read More »जासई विद्यालयात विविध स्पर्धा
जासई : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत शाळांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 7) झाला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »खांदा कॉलनीतील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ
नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती कामासाठी नगरसेवक संजय भोपी यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. 15मधील खांदा कॉलनी सेक्टर 8 मधील नवरत्न सोसायटीच्या फुटपाथवर सोसायटीतील …
Read More »जेएनपीटीची प्रभावी कामगिरी
भारतात प्रथमच 5.10 दशलक्ष टीइयू हाताळण्याची कामगिरी जेएनपीटी : वृत्तसेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील प्रमुख कंटेनर पोर्टने त्यांची कार्गो हँडलिंगमधील प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. पोर्टने सन 2019 या वर्षात 5.10 दशलक्ष वीस फूट इक्विवॅलंट युनिट म्हणजेच टीइयू यशस्वीपणे हाताळले आहेत. 2018मध्ये पोर्टने 5.5 दशलक्ष टीइयू हाताळले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper