Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आयएएस ऑफिसर ट्रेनींची जेएनपीटीला भेट

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी बंदरावरील सुविधांची पाहणी करण्यासाठी लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनीस्ट्रेशनच्या 2019 बॅचच्या आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी जेएनपीटीला भेट दिली. आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना जवाहरलाल नेहरू बंदरावरील कामाची तसेच त्यांच्या अर्थकारण, समाजातील भूमिकांची माहिती मिळावी हा या भेटीमागचा उद्देश होता. जेएनपीटी हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर पोर्ट …

Read More »

तळोजा सीईटीपीचे नूतनीकरण पूर्ण

प्रकल्प कार्यान्वित; जलप्रदूषण आवाक्यात आल्याचा दावा पनवेल : वार्ताहर राज्यात सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखल्या जाणार्‍या तळोजा एमआयडीसीच्या सीईटीपीचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबरपासून तळोजा एमआयडीसीतील जलप्रदूषण धोकादायक पातळीच्या बाहेर आल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला आहे. औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय बाहेर सोडता येत नाही. विविध …

Read More »

कचर्‍याचे नियोजन घरापासून करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधीनिरोगी आरोग्यासाठी कचर्‍याचे नियोजन करणे आवश्यक असून, त्याची सुरुवात आपल्या घरातून करावी, असे आवाहन भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.12) नवीन पनवेलमध्ये केले. विकासनिधीतील कामाचे भूमिपूजन आणि सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रमात आमदार ठाकूर बोलत होते.प्रभाग 17 (नवीन पनवेल) मधील नगरसेवक …

Read More »

पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) ठएउएछढ ढठएछऊड खछ खझठ उजझध ठखॠकढ अछऊ  झङअॠखअठखडच  या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करणेत आले होते. महाविद्यालयाचे आयक्यूएसी  सेल व सेंट्रल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

उद्यापासून क्रांतिवीर महोत्सवाला सुरूवात, विविध कार्यक्रमांची मेजवानी, सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये 15 ते 20 जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव होणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. बुधवारी (दि. 15) माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

‘रायगड सरस’ला उत्स्फुर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली प्रदर्शनास भेट

पनवेल : महाराष्ट्र शासनाच्यावतीने रायगड सरस या स्वयंसहाय्यता समुहातील हस्तकला वस्तु व खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन शहरातील गुजराती शाळेच्या मैदानात 10 ते 13 जानेवारी दरम्यान सुरु होते. या प्रदर्शनाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी सोमवारी भेट दिली. …

Read More »

मौजे-कल्हे येथे उभारण्यात आला बंधारा, पाणीसमस्या सोडविण्यासाठी पनवेल कृषी विभागाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त डिसेंबरनंतर ओढ्याचे पात्र कोरडे पडते, परिणामी ग्रामस्थांना व जनावरांना वणवण पाण्यासाठी भंटकंती करावी लागत म्हणून मौजे-कल्हे येथील लाडूची वाडी येथे पनवेलच्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी विभाग, कृषी कर्मचारी व लोकसहमतातुन बंधारा उभारण्यात आला. या विभागामध्ये लाडूची वाडी, काजू वाडी अशा वाड्या वसल्या आहेत. बंधारा …

Read More »

शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटकांसाठी शुभवर्तमान; शिव-समर्थ स्मारक फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले!

उरण : प्रतिनिधी 30 कोटी खर्च करुन जेएनपीटीकडून उरण येथे उभारण्यात येत असलेले 20 मीटर उंचीच्या शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पुर्णत्वास जाणार आहे. विविध सुविधा असलेले भव्य स्मारक येत्या फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले होणाऱे शिवस्मारक देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांसाठी शुभवर्तमान ठरणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने या …

Read More »

लोकनेते ‘दि. बां.’च्या जयंतीनिमित्त जासईत कार्यक्रम

जासई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय मजकूर संघाचे उपाध्यक्ष व कामगार नेते स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

कामोठे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दि. बा. पाटील यांची जयंती

कामोठे : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांची 94 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एम. खरात यांनी लोकनेते दि. बा. …

Read More »