दर्जेदार शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. संस्थेच्या उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ बुधवारी (दि.3) झाला. त्या वेळी ते …
Read More »प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार -भाजप प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बुधवारी (दि.3) पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत दिली. यासाठीचे बूथ विजय अभियान आजपासून सुरू झाले असून हे अभियान …
Read More »महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील- लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक कार्यकर्ता एकरूप होऊन काम करणार आहे, त्यामुळे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार …
Read More »मनसे, शेकाप पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगरप्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके, सुरज सवदे यांनी रविवारी (दि.31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …
Read More »रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु
रसायनी प्रतिनिधी: रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मोहोपाडा आळी आंबिवली येथील चौदा वर्षीय शालेय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण हा मित्रांसोबत पाताळगंगा एमआयडीसी …
Read More »भाजप उत्तर रायगडच्या दक्षिण भारत सेलची बैठक; 98 सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा दक्षिण भारत सेलची बैठक मार्केट यार्ड येथे श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच मंडळ सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.24) पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक ाजेश पिल्लई होते. या बैठकीत …
Read More »पनवेल परिसरातील पाणीप्रश्नी भाजप शिष्टमंडळाची एमजेपीच्या अभियंत्यांसोबत चर्चा
लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)चे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत …
Read More »तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमिन भालदार, विजय शिंदे, प्रदीप सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.21) पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष …
Read More »पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्यांना पदमुक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आल्या …
Read More »सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून सक्षम बनविले-लोकनेते रामशेठ ठाकूर
माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper