Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रेवदंडा बंदरात अवैध डिझेलविक्री; चौकडी गजाआड

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा येथील समुद्रात अवैधरित्या डिझेल विक्री करणार्‍या इंजिन बोटीवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकला आणि चौघांना अटक केली आहे. रेवदंडा रेती बंदरनजीक एक इंजिन बोट समुद्रातील अन्य बोटींना अवैधरित्या डिझेल विक्री करीत असल्याची खबर लागल्यावर खोपोली ठाणे निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. या वेळी …

Read More »

मांडवा-गेटवे जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार

अलिबाग : प्रतिनिधी मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी …

Read More »

रायगडातील शाळा, अंगणवाड्या झाल्या पाणीदार

नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे राजिपचे नियोजन अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाणी समस्या निकाली निघाली असून, सर्व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन हजार 158 शाळांपैकी तीन हजार 140 तर तीन हजार 53 अंगणवाड्यांपैकी तीन हजार 19 अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन जोडण्यात येऊन नळाद्वारे पाणी …

Read More »

रोह्यातील कोलाड रेल्वे फाटकावर गोळीबार; गेटमन जागीच ठार

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर सोमवारी (दि. 21) दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. गेटमन म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोलाड येथील तिसे रेल्वेफाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे …

Read More »

माणगाव कार्यालयातील तोडफोडप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह पाच जणांना अटक

जामिनावर सुटका माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणार्‍या माणगाव येथील चेतक इंटरप्राइझेसच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षासह पाच कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सनी कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत चेतक इंटरप्रायझेसकडून मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील इंदापूर ते लाखपाले बायपासचे काम सुरू …

Read More »

रोह्यात लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड

मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका रोहे, धाटाव : प्रतिनिधी रोहा पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या दमखाडी येथील श्रीराम लॉजवर शुक्रवारी रात्री उशिरा धाड टाकली. या प्रकरणी लॉज चालविणार्‍या मॅनेजरला अटक, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. रोह्यात सुरू असलेल्या अवैध, अनैतिक धंद्यांविरोधात गेले काही दिवस नागरिकांतून ओरड सुरू आहे. …

Read More »

मुरुड कोर्लई समुद्रकिनारी मोठा समुद्री कावळ्याचे दर्शन

रायगड जिल्ह्यात आढळलेला पहिला प्रौढ पक्षी पाली ः प्रतिनिधी रायगडातील मुरूड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊसजवळ दुर्मिळ मास्कड बुबी लेेलू (मोठा समुद्री कावळा) पक्षाचे दर्शन झाले. रायगड जिल्ह्यात बहुदा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी व वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे. अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव …

Read More »

रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यादिनाचा उत्साह

मुख्यालयी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा गौरव अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यादिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनी मंगळवारी (दि. 15) ध्वजारोहण जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते झाले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती म्हसे, सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन भरत …

Read More »

आगरदांडा येथे रेल्वे धावणार

शासनाकडून 65 शेतकर्‍यांना भूसंपादनासाठी नोटीस मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी या ठिकाणी येथे दोन मोठी बंदरे विकसित करण्यात येत आहेत. दिघी येथील बंदर विकसित झाले असून बंदरात बोटीमार्ग येणारा कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी रेल्वे मालगाडी आवश्यकता आहे. त्यासाठी आगरदांडा ग्रामपंचायत परिसरातील जागेवर रेल्वेरूळाची अधिकृत …

Read More »

रोह्यात जादूटोणा करणार्‍या सात जणांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

धाटाव : प्रतिनिधी रोह्यातील धामणसई गावच्या हद्दीत अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नऊ अनोळखी व्यक्ती जादूटोणा करीत असताना त्यांना सतर्क ग्रामस्थांनी पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या झटापटीत दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही व्यक्ती कोलाड विभागातील एका व्यक्तीसोबत शनिवारी (दि. 12) धामणसई …

Read More »