Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीच्या पोटात कैची खुपसून आणि नंतर शिलाई मशीन डोक्यात घालून तिची हत्या केली. कर्जत-कल्याण रस्त्यावरील हलिवली भागात शुक्रवारी (दि. 3) सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. कर्जत येथील हालिवली ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या सिंगनेचर डिझायर संकुल या इमारतीत …

Read More »

आरसीएफ विस्तारित प्रकल्पाचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय केमीकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) अलिबाग तालुक्यातील थळ येथील प्रस्तावित मिश्र खत प्रकल्पासाठीची जनसुनावणी अखेर पूर्ण झाली त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरसीएफ प्रकल्पाच्या 141 प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या आणि नंतरच जनसुनावणी घ्या अशी आक्रमक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जनसुनावणी  …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान

अलिबाग : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान बुधवारी (दि. 1) राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग शहरातील 20 किमी रस्ते, सरकारी कार्यालय परिसर, 1.50 किमी. समुद्रकिनारा स्वच्छ करून 39.777 टन कचरा संकलित केला. या स्वच्छता मोहिमेमध्ये रायगड …

Read More »

गुरुवारपासून दहावीची परीक्षा; रायगडात 35 हजार 733 परीक्षार्थी

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 2)पासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 35 हजार 733 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात 74 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परिक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली …

Read More »

खालापुरात मुंगूर व्यावसायिकांना दणका

पाताळगंगा नदीतून पाणी चोरीप्रकरणी कारवाई; साहित्य जप्त खोपोली ः प्रतिनिधी मुंगूर तलावासाठी नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा करणार्‍यांवर पाटबंधारे विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून पाणी उपसाचा पंप जप्त करण्यात आला आहे. महड, हाळ भागात मंगळवारी (दि. 28) ही कारवाई करण्यात आली. रायगड सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापुरात विविध …

Read More »

महाडमध्ये धोकादायक इमारतींमध्ये रहिवास

महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत पत्त्याप्रमाणे कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, मात्र ही दुर्घटना घडल्यानंतरदेखील अद्याप नागरिक आणि प्रशासन जागे झालेले नाही. पालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी मात्र अद्याप आपला रहिवास सोडलेला नाही. थातूरमातुर दुरुस्त्या करून इमारत विकासक त्यांना विश्वासात घेवून इमारतीमध्ये राहण्यास भाग पाडत आहेत. याबाबत पालिकेने …

Read More »

आरसीएफची पर्यावरण जनसुनावणी पूर्ण

स्थानिकांची आक्रमक भूमिका; पोलिसांचा हस्तक्षेप अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) अलिबाग तालुक्यातील थळ प्रकल्पाच्या विस्तारीत प्रकल्पाची   पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवारी (दि. 28) गोंधळाच्या वातावरणात झाली. या वेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. थळ येथील आरसीएफच्या विस्तारित प्रकल्पातून दररोज 1200 मेट्रीक टन मिश्र खत तयार केले जाणार आहे. यासाठी …

Read More »

शेकापला धक्का; पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

मुंबई : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

आंबिवली, माणगाव, बेकरे रस्त्याची दूरवस्था

विद्यार्थी, रुग्णांचे हाल; राजिपचे दुर्लक्ष कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्ट्यात असलेल्या आंबिवली, माणगाव, बेकरे आणि आंबिवली येथून एकसल गावाकडे जाणार्‍या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक वर्षे डांबर पडलेले नाही आणि त्यामुळे स्थानिकांना खड्डेमय आणि धुळीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी आंबिवली …

Read More »

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा योजनेंतर्गत रायगडात एक लाखहून अधिक शेतकर्‍यांना लाभ

अलिबाग : जिमाका केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सोमवारी (दि. 27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अंदाजे एक लाख आठ हजार 654 पात्र लाभार्थ्यांना 21 कोटी 73 लाख आठ हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. अल्प व …

Read More »