Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कोकण शिक्षक मतदारसंघात परिवर्तन होणार!

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा ना. उदय सामंत यांना विश्वास माणगाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची या वेळची निवडणूक परिवर्तनाची असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव येथील प्रचार सभेत …

Read More »

लोधिवलीतील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून प्रजासत्ताक दिनी लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. लोधिवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप नेते विनोद साबळे, लक्ष्मण पारंगे, लक्ष्मण पवार, उत्तम भोईर, …

Read More »

पोलादपुरात होतेय सार्वजनिक मालमत्तेची चोरी

पोलादपूर तालुक्यात शेती वगळता दुसर्‍या कोणत्याही व्यवसायाची पाळंमुळं रूजली नसल्याने गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक मालमत्तेची चोरी तसेच भंगारासोबत इंधन रसायनाच्या चोरीचेही धंदे फोफावू लागले आहेत. पोलादपूर शहरातील भैरवनाथनगरमधील पाणीपुरवठयाची सिंन्टेक्स्टची साठवण टाकी तुकडे तुकडे करून भंगारामध्ये विकल्याच्या घटनेवरून राजकारण तापल्यानंतर अशाप्रकारच्या अनेक साठवण टाक्यांचे तुकडे ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनांची वासलात …

Read More »

पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

रायगडच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन सुरू अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी शुक्रवारी (दि.  27)संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील …

Read More »

चेंढरे ग्रामपंचायतीची डिजीटल करवसुली

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी  प्रत्येक घराला दिलेल्या क्यूआर कोडने मोबाईल अँड्राईड अ‍ॅपद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा उपक्रम राबवला जात …

Read More »

माघ मासोत्सवात उसळली गर्दी

पालीमध्ये जत्रा भरली : 300 दुकाने थाटली; करोडोंची उलाढाल पाली : प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त व महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव (दि.22) ते (दि.26) पर्यंत साजरा होत आहे.  मासोत्सवासाठी पाली नगरी सजली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे. यानिमित्त पालीत मोठी जत्रा सुद्धा …

Read More »

माणगांव पळसगाव भागात बिबट्यांचा मुक्त संचार

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगांव तालुका पूर्व विभाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळसगाव भागात काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्या असल्याचे अनेक नागरिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना माणगाव वनविभागाचे वनरक्षक अनिरुद्ध ढगे यांनी दिल्या आहेत. वनविभागाने या भागात गस्त वाढवली आहे. ढालघर …

Read More »

रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. योगेश म्हसे हे म्हाडाचे कार्याधिकारी म्हणून कार्यरत होते, तसेच मार्केटिंगचे महाव्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. आताचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर …

Read More »

परदेशी रानमोडीचा उपद्रव वाढला

जैवविविधता धोक्यात, निसर्ग अभ्यासकांची चिंता वाढली पाली : प्रतिनिधी पाली सुधागड़सह रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर आणि गावातही बारीक पांढर्‍या फुलांनी भरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळतात. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रानमोडत आहे. झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून अन्य …

Read More »

गारमाळचा रस्ता निधीअभावी रखडला; निधीची प्रतिक्षा : ग्रामस्थांचे हाल सुरुच

खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील छत्तीशी भागातील  गारमाळ येथील ग्रामस्थ पक्का रस्त्याच्या  प्रतीक्षेत असून  रस्त्याला अजूनही निधीची प्रतिक्षा आहे.  नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत गारमाळ गाव असून मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच  किलोमीटर रस्त्याचे अंतर आहे. गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी बांधव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे येथील ग्रामस्थांना अडीच किमीची पायपीट करावी लागत आहे.  …

Read More »