खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ मंगळवारी (दि. 20) रात्री 8.25 वाजण्याच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील दहा भाविक जखमी झाले. त्यांना खोपोली नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंबिवली येथील भाविक छोटा हत्ती टेम्पोतून मंगळवारी कार्ला येथील एकविरा …
Read More »कर्जतच्या मतदारांनी दिला संमिश्र कौल
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवणे, कळंब, उक्रूळ, दहिवली तर्फे वरेडी, वावळोली, कोंदिवडे आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. मंगळवारी (दि. 20) मतमोजणी झाली. त्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दोन, ठाकरे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शेकापचा एक थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले. …
Read More »तळ्यातील रहाटाड ग्रामपंचायत भाजप-शिंदे गट युतीकडे
माणगाव : प्रतिनिधी तळा तालुक्यातील एकमेव रहाटाड ग्रामपंचायतीमध्ये भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीने विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. रहाटाडमध्ये सत्ता आल्याने गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रविवारी (दि.18) तळा तालुक्यातील रहाटाड ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सरपंच …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; तयारी पूर्ण
अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. 20) होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया झाली होती. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतीची निवडणूका जाहीर झाली होती. त्यापैकी 49 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने रविवारी 191 ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. …
Read More »कर्जतमध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढणार्या नवरदेवाकडून आधी मतदान
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) मतदान झाले. वावलोळी ग्रामपंचायतीमध्ये पोसरी येथील मतदान केंद्रावर चक्क बोहल्यावर चढण्यास निघलेला नवरदेव आधी मतदान आणि नंतर लग्न असे ठरवून मतदान केंद्रावर पोहचला. सुमारे 90 टक्के मतदान झाले. कर्जत तालुक्यातील उकरुळ, मांडवणे, कोंडीवडे, वावळोली, कळंब, दहीवलीतर्फे वरेडी आणि वेणगाव या …
Read More »खोपोली पोलिसांकडून एकाला अटक
निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्रे व गुटख्याची वाहतूक खालापूर ः प्रतिनिधी खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील साजगांव आणि देवन्हावे या दोन ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (दि. 18) झाली. या निवडणुकीदरम्यान खोपोली पोलिसांनी अवैधरित्या शस्त्रे व गुटख्याची वाहतूक करणार्या एकाला अटक केली आहे. मतदानाच्या दिवशी रविवारी एक सफेद स्कॉर्पिओ (क्र. एमएच 05 एएक्स 6201) …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात भरघोस मतदान
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मतदानप्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केली होती, तर पोलिसांकडूनही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, एक हजार 429 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे …
Read More »“हिंदू धर्मद्वेषी सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करा”
खालापुरातही वारकरी आक्रमक; पोलिसांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी हिंदू देवदेवता आणि साधू-संतांविषयी वारंवार बेताल वक्तव्ये करून हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करणार्या, जातीय तेढ निर्माण करणार्या आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग करणार्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन खालापूर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान
राजकीय पक्षांसह प्रशासन सज्ज, पोलीसही दक्ष अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबर जिल्हा प्रशासनाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 618 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन लाख 97 हजार 370 मतदार या निवडणुकीत …
Read More »रायगड पोलिसांकडून दीड कोटींच्या सोने चोरीचा छडा
अलिबाग : प्रतिनिधी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून एक कोटी 44 लाख किमतीची सोन्याची बिस्कीटे चोरणार्या आरोपीच्या मध्यप्रदेशातील घरातून रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) एक कोटी 42 लाख 25 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, मात्र आरोप पप्पू बाबू खान मुलतानी फरार …
Read More »