Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीनजीक अपघातात सहा जणांचा मृत्यू, दोघे जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीनजीक ढेकू गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 17) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एर्टिगा कारने पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे येणार्‍या …

Read More »

पनवेलमध्ये सुवर्णा भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण

अलिबाग : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी दोन असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग …

Read More »

वैजनाथ देवस्थान जमिनी गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न - किरीट सोमय्या

कर्जत तहसीलदारांशी केली चर्चा कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री केल्याप्रकरणी माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 17) कर्जत तहसीलदार कार्यालयात भेट दिली. त्यांनी तहसीलदारांशी या विषयावर चर्चा केली. ठाकरे सरकारच्या काळात हे गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करून …

Read More »

पालीवाला महाविद्यालयाचे कोकण झोन क्रीडा विभाग स्पर्धेत यश

पाली : प्रतिनिधी शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ कोकण झोन क्रीडा विभागातील स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत 1500 मी व 5000 मी महिला गट ऋतुजा सकपाळ सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट लक्ष्मण दरवडा सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट करण माळी कांस्य पदक, 10,000 …

Read More »

अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा शिरूर यांचा पनवेलमध्ये सन्मान

अलिबाग : रामप्रहर वृत्त जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा नुकताच पनवेलमध्ये सन्मान करण्यात आला. पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र …

Read More »

पालीत माकडांचा उच्छाद; नागरिक त्रस्त

सुधागड : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीमध्ये माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून या माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पालीकर करीत आहेत. पाली बाजारपेठ, मधली आळी, खडक आळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगर आळी अशा सर्वच गजबजलेल्या भागात माकडे …

Read More »

विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

खालापूर : प्रतिनिधी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणात सीआयडीने मेटे यांच्या वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात कलम 304 (2) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने …

Read More »

रायगडच्या नैतिक, सिद्धार्थ यांची महाराष्ट्रच्या संभाव्य संघात निवड

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे निवडण्यात 16 व 25 वर्षांखालील  राज्याच्या संभाव्य संघात रायगड जिल्ह्यातील नैतिक सोळंकी आणि सिद्धार्थ या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाचे शिबिर पुणे येथे सुरू आहे. नैतिक व सिद्धार्थ यांची अनुक्रमे 16 व 25 वर्षांखालील महाराष्ट्र संभाव्य  संघ निवड  निवड करण्यात आली …

Read More »

रसायनयुक्त सांडपाणी वाहिनी फुटली; शिरगाव ग्रामस्थ आक्रमक

महाड : प्रतिनिधी   महाड एमआयडीसीमधून रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वडवली गावाजवळ सोमवारी (दि. 14) सायंकाळी सातच्या सुमारास फुटली. त्यामुळे परिसरातील अनेक शेतांमध्ये रसायनयुक्त सांडपाणी गेल्याने शेतकरी आक्रमक झाले. शिरगाव ग्रामस्थांनी यावेळी महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून …

Read More »

कर्जतमध्ये भगवान बिरसा मुंडांना अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मंगळवारी (दि. 15) अभिवादन केले. कर्जत नगर परिषद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला रवींद्र लाड, बापू बहिरम, अविनाश पवार, दयानंद गावंड, हरिश्चंद्र वाघमारे, हृदयनाथ गायकवाड, निलेश देशमुख, कल्याणी लोखंडे, विभावरी म्हामूणकर, दिलीप लाड, …

Read More »