मुरुड : प्रतिनिधी मोटारसायकलवरून गोमांस विकण्यासाठी चाललेल्या विहूर येथील एका इसमास मुरुड पोलिसांनी बुधवारी (दि. 20) अटक केली असून, त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मनानं पांगारकर असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, जावेद वाळवटकर असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …
Read More »रिलायन्स प्रकल्पबाधीत शेतकरी सरसावले
अलिबाग : प्रतिनिधी पालकमंत्र्यांच्या आदेशाची तातडीने पूर्तता करावी व शेतकर्याची फसवणूक करणार्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी. बाधीत शेतकर्यांना नुकसान भरपाईतील वाढीव मोबदला देण्यात यावा. मागणीसाठी पेण आणि खालापूर तालुक्यातील रिलायन्स प्रकल्प बाधीत शेतकर्यांनी बुधवार (20 फेब्रुवारी) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. यानंतरही जिल्हाधिकारी, कंपनी प्रशासनाने …
Read More »अलिबागेत धरणे आंदोलन, साखळी उपोषण
रस्त्याच्या कामासाठी मानकुले ग्रामस्थ बांधकाम कार्यालयासमोर एकवटले अलिबाग ़: प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शिरवली – मानकुले रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी मानकुले ग्रामस्थांनी गुरूवसरी (दि.21) सार्वजनिक बांधकम विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात धरणे आंदोलन केले. अलिबाग तालुक्यातील शिरवली – मानकुले रस्त्याची दूरवस्था झाली आहे. 4 जानेवारी 2017 रोजी या रस्त्याच्या …
Read More »विकासाची गंगा
मुंबईच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरणांचा अधिक चांगला समन्वय व अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारकडून हे प्रशासकीय मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. मुळातच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यास मुंबईचा भुप्रदेश अपुरा पडू लागल्यावर आसपासच्या परिसराचा विकास नियोजनपूर्वक करण्याकरिताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. मुंबई आणि आसपासचा परिसर …
Read More »शांतता… परीक्षा चालू आहे!
फेब्रुवारी-मार्च महिना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी-बारावीच्या परीक्षेने दिनांक 22 फेब्रुवारीपासून परीक्षा सत्राला सुरुवात झाली आहे. ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असतात त्यांच्या घरात कमालीची शांतता दिसून येते. आपल्या मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून …
Read More »आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब; रायगडात खळबळ
रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्जतवरून वस्तीची बस बुधवारी (दि. 20) रात्री 10च्या सुमारास आपटा थांब्यावर आल्यावर वाहक-चालकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन …
Read More »नेरळ भाजपच्या नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद; उपक्रम यशस्वी
कर्जत : बातमीदार नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल येथील श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेरळ येथील 73व्या नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. नेरळ भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या या नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी भाजपचे …
Read More »खोपोली भाजप उपाध्यक्षपदी चंद्राप्पा अनिवार, इंदरमल खंडेलवाल
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार आणि इंदरमल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोपोली दौर्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकर्त्यांनी आगामी काळात जोरदार कामाला लागावे, असा सल्ला पालकमंत्री चव्हाण यांनी …
Read More »पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नागोठणे बंद
नागोठणे : प्रतिनिधी पुलवामा येथे भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष तसेच व्यापारी संघटना, रिक्षा तसेच इतर सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या नागोठणे बंदला मंगळवारी (19 फेब्रुवारी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ, खुमाच्या नाक्यावरील दुकाने तसेच हॉटेल, सलून, टपर्या, तीन व सहा आसनी रिक्षा बंद ठेवून …
Read More »जगातील एकमेव चारित्र संपन्न व कर्तृत्वान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय – प्रा.तुकाराम मस्के
रोहे : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महारांजानी कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. त्यांनी राष्ट्राला सर्मिपत होणारी माणसे निर्माण केली. जगातील एकमेव चारित्र संपन्न व कर्तृत्वान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.तुकाराम मस्के यांनी येथे केले. रोहा तालुका सकल मराठा समाजातर्फे येथील राम मारुती चौकात मंगळवारी शिवजन्मोत्सव …
Read More »