Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी  जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी  निवेदनात म्हंटले आहे की,  पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पामुळे तालुक्यातील …

Read More »

नागोठणेतील शिवमंदिरे गजबजली

नागोठणे : महाशिवरात्रीनिमित्त नागोठणे शहरातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील पुरातन रामेश्वर मंदिर, ब्राह्मण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर, तसेच नागोठणे-रोहे मार्गावरील भिसे खिंडीतील शंकर मंदिर सोमवारी (दि. 4) दिवसभर भाविकांनी फुलून गेले होते. कायस्थ प्रभू समाजाचे रामेश्वर मंदिरात जोगळेकर गुरुजींच्या पौराहित्याखाली सकाळी अजय अधिकारी यांच्या हस्ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक, तसेच …

Read More »

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : जिल्ह्यातून 14 हजार 277 कामगाराचा सहभाग

अलिबाग : केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ मंगळवारी (दि. 5) देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »

चित्रकार प्रदीप घाडगे यांचे ‘रंगी रंगला’ चित्रप्रदर्शन मुंबईत

कर्जत : विजय मांडे कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी …

Read More »

दत्तमंदिर रस्त्याचे काम निकृष्ट; नागरिकांत नाराजी

मुरुड : प्रतिनिधी जिल्हा नगरोत्थान विकास योजनेंतर्गत मुरुड नगर परिषदेस मिळालेल्या 20 लाखांच्या निधीतून शहरातील पाण्याची टाकी ते दत्तमंदिर रस्त्याचे काम करण्यात येत आहे, मात्र या कामाची सुरुवातच निकृष्ट दर्जाने झाल्याने येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. डांबराचा वापर कमी असल्याने टाकी ते दत्तमंदिर या रस्त्यावर टाकलेली खडी मूळ रस्त्याला …

Read More »

श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद

भातशेती, कडधान्य व भाजीपाला बागायतीचे नुकसान श्रीवर्धन : प्रतिनिधी मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे सध्या श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे परिसरातील शेती आणि मळे उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान होत आहे, मात्र नगर परिषदेकडून या भटक्या घोडे व गुरांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याचे …

Read More »

नागोठण्यात विजयी संकल्प रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे विभागीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीला शहरात उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आनंद लाड, मनोज धात्रक, प्रकाश मोरे, अंकुश सुटे, मोरेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, हिरामण तांबोळी, अनिल पवार, शेखर गोळे, योगेश म्हात्रे, फातिमा सय्यद, रऊफ कडवेकर, विहार …

Read More »

पालकमंत्र्यांमुळे विकासकामांना गती

पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे पेण नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांना गती मिळाली असून, त्यापैकी काही विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 6) सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

उरण तालुक्यात ‘ॐ नम: शिवाय’चा गजर

जेएनपीटी : प्रतिनिधी बम बम भोले, हर हर महादेव, ओम नमः शिवायचा गजर करत समुद्रावर स्वार होत काल हजारो शिवभक्तांनी घारापुरी येथील प्रसिद्ध शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उरण, पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई येथून दरवर्षी जवळजवळ 50 ते 75 हजार शिवभक्त घारापुरी येथे येतात. घारापुरी येथे जाणार्‍या …

Read More »

महाड एसटी स्थानकाचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

महाड : प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे रखडलेल्या महाड बसस्थानकाच्या नूतन व आद्ययावत इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने वचनपूर्ती केली असून सहा कोटी खर्चाच्या या बसस्थानकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (दि 7)सकाळी 11 वाजता पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ. …

Read More »