कार अपघातासह मोटारसायकलस्वार कोसळून जखमी पाली : प्रतिनिधी : पाली-खोपोली मार्गावर सांडलेल्या ऑईलवरून शुक्रवारी (दि. 22) अनेक वाहने घसरल्याची घटना घडली. त्यात काही मोटारसायकलस्वार कोसळून जखमी झाले, तर एका कारचा अपघात झाला. पाली-खोपोली मार्गावर वजरोली गावानजीक एका वळणावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते. रस्त्यावरून येणार्या मोटारसायकलस्वारांना ऑईल साडल्याचे …
Read More »अलिबागसे आया है क्या? या वाक्यावर बंदी घाला
राजाभाऊ ठाकूर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका अलिबाग : प्रतिनिधी : अलिबागसे आया है क्या, या वाक्यावर गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था, व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा सोक्षमोक्ष लावण्याचे काम राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून …
Read More »उद्योगपती अशोक मित्तल यांच्या रिसॉर्टवर होणार कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी : सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेले प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचे रिसॉर्ट पडण्याच्या कारवाईला आता वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही कारवाई केली जाणार आहे. अशोक मित्तल यांचे अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे हॉलिडे रिसॉर्ट आहे. बॉम्बे इन्व्हर्मेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत …
Read More »माथेरानमध्ये मालगाडी सुरू करा; स्थानिकांची मागणी
कर्जत : बातमीदार माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असून, येथील पर्यटन अबाधित राहण्यासाठी व येथील निसर्गचा र्हास होऊ नये म्हणून येथे मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना मालवाहतूक मनुष्यबळावर करावी लागते. पण कालानुरूप मालवाहतुकीकरीता माणसे मिळणे कठीण झाले आहे. यासाठी येथील स्थानिकांनी मालवाहतूक करणारी मालगाडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी …
Read More »रायगडात राजकीय घडमोडींना वेग
नाराजांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. इतर पक्षातील नाराजांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता खर्या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत …
Read More »सुनील तटकरे यांचे मधू ठाकूरांपुढे लोटांगण
अलिबाग : प्रतिनिधी सुनील तटकरे यांना अलिबागेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भीमगर्जना करणार्या काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यशस्वी झाले असून, गुरुवारी धूळवडीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने अलिबागेत आलेल्या सुनील तटकरे यांनी पापांपुढे चक्क लोटांगण घालत निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दोन …
Read More »भोजनदान व पाणीवाटप उपक्रम
महाड ः चवदार तळे येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, दिवंगत एम. एस. जाधव (माजी नगरसेवक पनवेल) प्रतिष्ठान व क्रांतिभूमी विचार मंच महाड यांच्या वतीने भोजनदान व पाणीवाटप उपक्रम राबविण्यात आला. त्याचा प्रारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद …
Read More »होळी, धूळवड उत्साहात
महेश बालदी मित्रमंडळाच्या वतीने राबवला उपक्रम उरण ः प्रतिनिधी उरण शहरात होळी व धूळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी लहानथोरांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक एकमेकांना रंगवून आपला सण साजरा करताना दिसत होते. बुरा न मानो होली है, असे म्हणत रंगवून घेताना व रंगविताना नागरिक या सणाचा मनमुराद आनंद घेत होते. …
Read More »माणगावजवळ स्विफ्ट कार-क्वालीस धडक ; 10 जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कोशिंबळे (ता. माणगाव) गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार आणि क्वालीस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 10 प्रवासी जखमी झाले, तसेच या दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, गाडीचा चालक प्रसाद घाणेकर (34, रा. …
Read More »वाहनबंदी कायद्याला हरताळ
रात्रीच्या अंधारात माथेरानमध्ये आणखी दोन ट्रक घुसले; नगरपालिकेचे उंटामागून घोडे कर्जत : बातमीदार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून मालवाहू वाहने शहरात जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान नगरपालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही या प्रकाराची दखल …
Read More »