Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

चिर्बी, माचेला खारभूमी योजनेचे बळकटीकरण करणार

खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांची ग्वाही; शेतकरी आणि कंपनी अधिकार्‍यांची बैठक पेण : प्रतिनिधी राज्यशासन शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, पेण तालुक्यातील चिर्बी, माचेला खारबंधिस्तीचे बळटीकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी (19 फेब्रुवारी) येथे दिली. जेएसडब्ल्यू स्टिल कंपनी …

Read More »

म्हसळा आडी बंदर येथील झोपडीला आग

आदीवासी महिला भाजली म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील आडी बंदरवाडी येथील दिलावर यांच्या  आंबा बागायतीतील झोपडीला सायंकाळी आग लागली. यावेळी जळत्या झोपडीतील कपडे काढण्यासाठी गेलेली शैला विजय हिलम (वय 22) ही आदिवासी महिला सुमारे 70 टक्के भाजली. विजय हिलम व त्याची पत्नी शैला हे आडी बंदर येथील दिलावर यांच्या आंबा …

Read More »

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एल्गार

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने 2005 नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या  कर्मचार्‍यांसाठी जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान  निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. जूनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी, यासाठी लढा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या प्राथमिक विभागाच्या महाड येथे झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात घेण्यात आला आला. महाराष्ट्र …

Read More »

शेलू गावाच्या जंगलात सापडली दहा वर्षांची मुलगी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जंगलात मंगळवारी (19 फेब्रुवारी) सकाळी तेथील पोलीस पाटील मनोज पाटील यांना एक 10 वर्षाची मुलगी सापडली. संबंधित पोलीस पाटील यांनी सदर मुलीला नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आई मारणार म्हणून नंदिनी आलोकनाथ चव्हाण ही चौथी इयतेत असलेली मुलगी मंगळवारी सकाळी 8 वाजता आपल्या …

Read More »

कर्जतची करिश्मा बनली पॅसिफिक सुंदरी

कर्जत : बातमीदार [google-translator] मुंबई विलेपार्ले येथील सहारा स्टार इंटरनॅशनलमध्ये मिस अ‍ॅण्ड मिसेस इंडिया पॅसिफिक 2019 ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. शंभरहुन अधिक मिस आणि मिसेस या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात विविध देशांतील महिलांचाही सहभाग होता, त्यामधून 10 जणांची निवड करण्यात आली आणि यामध्ये कर्जतच्या करिश्मा सैनी या …

Read More »

नेरळमध्ये पाकिस्तानचा धिक्कार

कर्जत : बातमीदार पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेरळमध्ये रविवारी (17 फेब्रुवारी) रात्री कँडल मार्च काढण्यात आला. त्यात सर्व जातीधर्माचे आणि सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कँडल मार्चनंतर नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील जकात नाका येथून ‘नेरळकर’ …

Read More »

पाच वर्षातील प्रत्येक दिवस कर्जतकरांच्या सेवेत -नगराध्यक्षा सुवर्णा जोशी

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सुवर्णा केतन जोशी यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) पदभार स्वीकारला. नगराध्यक्ष पदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आपला प्रत्येक दिवस कर्जतकर जनतेच्या सेवेत असेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. कर्जत नगर परिषद कार्यालयात पोहचण्याआधी महायुतीच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात …

Read More »

मुंबई-गोवा महामार्ग मोजणीत घोटाळा नाही प्रांत कार्यालयाचा पत्रकार परिषदेत निर्वाळा

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर रस्ता रूंदीकरणाकरिता  खारपाडा (ता. पेण) येथील जमीन  संपादित करण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भूमिअभिलेख विभागाचे पेण उपअधीक्षक आणि एनएचएआय (संपादन संस्था) यांनी एकत्रितपणे संपादित जमिनीची  पुनर्मोजणी केली आहे. या मोजणीत घोटाळा नाही, असा निर्वाळा पेण प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार शशिकांत …

Read More »

भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाका भाजप नेते अॅेड. महेश मोहिते यांचे उसरोलीत आवाहन

मुरूड : प्रतिनिधी उसरोली ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार करणार्‍यांची सत्ता आहे. या निवडणुकीत भ्रष्टाचार्‍यांची सत्ता उलथवून टाकून, मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) खारीकवाडा येथे केले. मुुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, भाजप …

Read More »

जांबरूंग धरण 38 वर्षांपासून कागदावरच

काम रखडल्याने बजेट 80 पटींनी वाढले खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील रेल्वेलाईन पट्ट्यातील नावंढे, केळवली, वांगणी वणी, बीड, जांबरूंग, खरवई, डोलवली आदी 15 गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी 1980मध्ये जांबरूंग धरणाला मान्यता देण्यात आली आहे, मात्र गेल्या 38 वर्षापासून या धरणाचे काम रखडले असल्याने या 15 गावांना दरवर्षी उन्हाळ्यात …

Read More »