Breaking News

क्रीडा

अर्जेटिनाच्या संघात मेस्सीचे पुनरागमन

ब्यूनोस आयर्स : वृत्तसंस्था स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर प्रथमच अर्जेंटिनाच्या संघात सहभागी झाला. मेस्सी सुमारे आठ महिने देशाच्या संघाबाहेर होता. प्रशिक्षक लियोनेल स्कालोनी यांनी मेस्सीला व्हेनेझुएला व मोरोक्को या संघाविरुद्ध होणार्‍या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे. पाच वेळा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आलेल्या 31 वर्षीय मेस्सीने …

Read More »

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा; सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

बर्मिंघम : वृत्तसंस्था सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने डेन्मार्कच्या होमार्कला; तर श्रीकांतने जोनाथन ख्रिस्तीला पराभूत केले. ऑलिम्पिकची माजी कांस्यपदक विजेती सायनाने लाइन होमार्क जॉर्सफेल्टविरुद्ध रोमहर्षक सामन्यात विजय संपादन केला. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सायनाने शानदार कामगिरी करीत सामना …

Read More »

डब्ल्यूडब्लूईसाठी 80 खेळाडूंची निवड

मुंबई : प्रतिनिधी डब्ल्यूडब्लूईच्या भारतातील पहिल्यावहिल्या ट्रायआऊट्स अर्थात खेळाडू निवडीचे आयोजन मुंबईच्या नेस्को येथे तयार केलेल्या खास रिंगणामध्ये नुकतेच करण्यात आले होते. भारतभरात तुफान लोकप्रिय असणार्‍या या करमणूक प्रधान खेळासाठी तब्बल 60 पुरुष आणि 20 महिलांची अंतिम पात्रता फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांच्या उपस्थितीत या वेळी दोन शो सामन्यांचे आयोजन …

Read More »

धवन घसरला, पंतचा भाव वधारला! बीसीसीआयकडून खेळाडूंची करार यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2018-19 वर्षाकरिता आपल्या खेळाडूंसाठी वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ए+, ए, बी आणि सी असे चार प्रकार करण्यात आले असून, ए+ प्रकारात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंनाच जागा देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात …

Read More »

हाऊज द जोश! टीम इंडियाने घातल्या आर्मीच्या कॅप

रांची : वृत्तसंस्था पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप परिधान केल्या. माजी कर्णधार व लोकल बॉय महेंद्रसिंह धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. त्याचबरोबर देशवासियांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, …

Read More »

घरच्या मैदानावर धोनीची शेवटची मॅच?

रांची : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर हा सामना होईल. रांची हे एमएस धोनीचं घरचं मैदान आहे. 37 वर्षांच्या धोनीनं या मैदानात एकूण 3 मॅच खेळल्या आहेत. शुक्रवारी धोनी इकडे चौथी मॅच खेळेल, पण धोनीची ही चौथी मॅच त्याच्या घरच्या मैदानातली …

Read More »

धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा मोहत्सव 2019 उत्साहात

रोहे : प्रतिनिधी धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2019 राजिप शाळा लांढर येथे दि. 28 फेब्रु. व दि. 01 मार्च सकाळी 7 ते सायं 6 या दरम्यान घेण्यात आला. धाटाव, वाशी, तळाघर, निवी, महादेवाडी, वरसे, विष्णू नगर, किल्ला, रोठ खुर्द, रोठ बुद्रुक, बोरघर या शाळांनी सहभाग घेत 1 मार्च रोजी केंद्र …

Read More »

सलग सहाव्यांदा सुनीत जाधव ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा, चारही जेतेपदं मुंबईकडे

मुंबई : प्रतिनिधी मध्यरात्री दीडच्या ठोक्यालाही प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष… महागणपतीच्या साक्षीने टिटवाळाकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद… सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच बाजी मारली. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने सलग सहाव्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करीत जेतेपदाचा …

Read More »

रायगड संघाची निवड चाचणी स्पर्धा रविवारी

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने आमचा चषक ‘रायगड श्री 2019’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा कामोठे येथे पोलीस स्टेशनसमोर रविवारी (दि. 10) रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. या स्पर्धेतून रायगड जिल्हा …

Read More »

दीपाच्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप सहभागाला ‘साई’चा हिरवा कंदील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मंगळवारी दीपा कर्माकरच्या आगामी बाकू आणि दोहा येथे होणार्‍या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपच्या सहभागाला हिरवा कंदील दाखविला आहे, मात्र भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला पुरुष जिम्नॅस्टसाठी निवड चाचणी घेण्यास सांगितले. याबाबतचे पत्र ‘साई’ने भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला (जीएफआय) पाठविले आहे. यात ‘साई’ने दीपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर …

Read More »