उरण : रामप्रहर वृत्त सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने होळीनिमित्त रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित आहे. स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश फी …
Read More »मुंबईचा दिल्लीवर शानदार विजय
इंदूर : वृत्तसंस्था मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीत दिल्लीवर आठ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कर्नाटककडून पराभव पत्करणार्या दिल्लीविरुद्ध तुषार देशपांडेची भेदक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्पर्धेतील पहिला विजय नोंदवत चार गुणांची कमाई केली. नाणेफेक गमावल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित …
Read More »इंग्लंडने वेस्ट इंडिजला अवघ्या 45 धावांत गुंडाळले
सेंट किट्स : वृत्तसंस्था दुसर्या ट्वेन्टी-20 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला. विश्वविजेत्या विंडीज संघाला इंग्लंडने फक्त 45 धावांत बाद केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करणार्या विंडीजने इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकली. गेल आणि हेटमायरसारखे टी-20 स्पेशालिस्ट खेळाडूही विंडीजचा …
Read More »भारताचे सहा बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल
फिनलँड : वृत्तसंस्था 38व्या आंतरराष्ट्रीय जीबी बॉक्सिंग स्पर्धेत तीन वेळा आशियाई विजेता शिवा थापा (60 किलो) आणि माजी युवा विश्वविजेता सचिव सिवाच (52 किलो) यांच्यासह सहा भारतीय बॉक्सिंगपटूंनी उपांत्य फेरी गाठून पदकाची निश्चिती केली आहे. माजी विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या थापाने पोलंडच्या डॉमिनिक पलकचा उपांत्यपूर्व फेरीत 5-0 असा पराभव केला. …
Read More »आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कुश भगतला कांस्यपदक
मुंबई : प्रतिनिधी येथील नऊ वर्षीय कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे झालेल्या खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणार्या कुशला आठव्या फेरीत पराभव पत्करावा लागला आणि नवव्या फेरीतील डाव बरोबरीत सोडवल्यामुळे त्याला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्याने नवव्या फेरीअखेर सहा गुणांची कमाई करीत तिसरे …
Read More »स्वप्नाला मिळाले खास जोडे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी ‘सुवर्ण’ कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा-सहा बोटे असलेल्या पायांच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या आदिदास या कंपनीने स्वप्नाला खास जोडे उपलब्ध करून दिले. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. त्यामुळे आदिदास कंपनीने …
Read More »कुलदीपच्या प्रगतीचा चढता आलेख
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. या वेळी कुलदीप संघासाठी धावून आला. कुलदीप यादवने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्के दिले. त्याने कर्णधार फिंच, शॉन मार्श आणि पिटर हँडस्काँबला माघारी धाडले. या कामगिरीसह …
Read More »तंत्रज्ञानाचा चुकीचा फिंच ठरला बळी
रांची : वृत्तसंस्था तिसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. विजयासह पाहुण्यांनी मालिकेत 2-1 असे पुनरागमन केले, परंतु या सामन्यात एक नाट्य घडले आणि ऑसी कर्णधार अॅरॉन फिंचला बाद ठरविताना तंत्रज्ञान चुकीचे ठरले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करीत भारताला विजयासाठी 314 …
Read More »इंग्लंडच्या महिलांचा भारताला व्हॉईटवॉश
गुवाहाटी : वृत्तसंस्था भारताविरुद्धची ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका इंग्लंडने 3-0 अशी जिंकत यजमानांना व्हाईटवॉश दिला. तिसर्या सामन्यात भारताचा अवघा एका धावेने पराभव झाला. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताला 120 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला अखेरच्या षटकात 3 धावांची गरज होती, पण भारतीय महिला संघाला फक्त एकच …
Read More »कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी, दिलखूष विजेते
मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पांडवादेवी रायवाडी संघाने पुरुषांमध्ये; तर दिलखूष आवास संघाने महिलांमध्ये अजिंक्यपद पटकाविले. पांडवादेवीचा केदार लाल आणि दिलखूषची हर्षदा नाखवा सर्वोत्तम खेळाडू ठरले. मुरूड येथील श्री काळभैरव मंडळाच्या पटांगणावर झालेल्या पुरुषाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper