Breaking News

क्रीडा

जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस ः वृत्तसंस्थाफ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत दोन सेट गमावूनही सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सलग 13 गेम जिंकून झोकात पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही आघाडीवर असताना अखेर प्रतिस्पर्ध्यानेच दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोव्हिचच्या 15व्या फ्रेंच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.अग्रमानांकित जोकोव्हिच इटलीच्या 19 वर्षीय लोरेंझो मुसेटीविरुद्ध 6-7 (7-9), 6-7 …

Read More »

यंग इंडिया श्रीलंकेशी भिडणार

वन डे आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय युवा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौर्‍यात उभय संघांत तीन वन डे आणि तीन टी-20 मालिका खेळवण्यात येतील. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. 13 जुलै ते 25 जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेला भिडेल. …

Read More »

फ्रेंच ओपन : जोकोव्हिच, नदाल विजयी

पॅरिस ः वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी राफेल नदाल यांनी विजयी घोडदौड कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. गतविजेती इगा श्वीऑनटेक, अमेरिकेची सोफिया केनिन तसेच अमेरिकेची स्लोएन स्टीफन्स आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनीही पुढील फेरीतील स्थान निश्चित केले.अग्रमानांकित जोकोव्हिचने …

Read More »

टी-20 विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान बीसीसीआयला विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली, परंतु देशातील …

Read More »

दुखापतीमुळे बार्टीची फ्रेंच ओपनमधून माघार

पॅरिस ः वृत्तसंस्था अग्रमानांकित अ‍ॅशले बार्टी हिने दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली आहे. महिलांमध्ये नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी सोफिया केनिन, एलिना स्वितोलिना आणि डॅनिल मेदवेदेव यांनी तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला आहे. 2019मध्ये विजेतेपद पटकावणारी बार्टी पोलंडच्या मॅगदा लिनेटविरुद्धच्या …

Read More »

भारतीय खेळाडूंच्या गणवेश, क्रीडा साहित्याचे अनावरण; टोकियो ऑलिम्पिक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या अधिकृत गणवेश आणि क्रीडा साहित्याचे अनावरण क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी भारताचे पथक 190 सदस्यांचे अपेक्षित असून, यात 100 क्रीडापटूंचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी या वेळी दिली.आतापर्यंत भारताचे 56 …

Read More »

डेव्हन कॉनवेने रचला इतिहास; षटकार खेचत झळकावले ऐतिहासिक दुहेरी शतक

लंडन ः वृत्तसंस्था लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. कॉनवेने मार्क वूडला षटकार मारत त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. इंग्लंडमध्ये पदार्पण करताना दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कॉनवेने 347 चेंडूंत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. यामध्ये 22 चौकार आणि एक षटकाराचा समावेश …

Read More »

भारतीय संघ इंग्लंडला रवाना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामुंबईमध्ये विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ बुधवारी रात्री उशिरा इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघ 10 दिवस विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला सरावाची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाल्याचे बीसीसीआयने ट्विट करीत सांगितले. विराट कोहली, रोहित …

Read More »

मँचेस्टर सिटीला नमवून चेल्सी ‘चॅम्पियन’; फुटबॉल लीग

पोर्तोे (पोर्तुगाल) ः वृत्तसंस्थाकाई होवित्झच्या एकमात्र गोलमुळे चेल्सीने मँचेस्टर सिटीला 1-0ने हरवले आणि नऊ वर्षांत दुसर्‍यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात होवित्झने 42व्या मिनिटाला चेल्सीसाठी एकमेव विजयी गोल केला. मेसन माउंटच्या पासवर त्याने हा गोल केला. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीच्या संघाला सलग दुसर्‍या विजेतेपदाने हुलकावणी …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अशोक कुमार सामनाधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती सामन्यांत सामनाधिकारी (रेफरी) म्हणून अशोक कुमार यांचा समावेश झाला आहे. कुमार हे एकमेव भारतीय कुस्ती रेफरी म्हणून ऑलिम्पिकमध्ये असतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने त्यांना नामांकन दिले आहे. ‘या स्पर्धेत निवडलेला मी एकमेव भारतीय रेफरी आहे. मी …

Read More »