हैदराबाद ः वृत्तसंस्था भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए)च्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. एचसीएच्या सर्वोच्च समितीने अझरविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अझरला बजावलेल्या नोटीसीत, तुमच्याविरुद्ध अनेक सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यावर विचार केल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेलाय, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या …
Read More »कसोटी क्रमवारीत कोहली चौथ्या स्थानी
दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जाहीर झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानी मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पुन्हा अग्रस्थान गाठण्याची किमया साधली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटला चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या कसोटी क्रमवारीतील स्थानात घसरण …
Read More »युरो कप : इटलीची बाद फेरीत धडक
रोम ः वृत्तसंस्था युरो कप स्पर्धेच्या ‘अ’ गटातील चौथ्या सामन्यात इटलीने स्वित्झर्लंडला 3-0ने मात दिली. सलग दोन विजयांसह इटलीने बाद फेरीत धडक मारली आहे. इटलीचा मिलफिल्डर मॅन्युअल लोकेटेली याने 26व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल केले. या गोलसाठी डॉमेनिका बेरार्डी याने पास दिला होता. लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल …
Read More »फ्रान्सची जर्मनीवर 1-0ने मात
म्युनिक ः वृत्तसंस्थाअत्यंत भरात असलेल्या विश्वकप विजेत्या फ्रान्सच्या संघाने कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीचा युरो कप 2020मध्ये 1-0 असा पराभव केला आहे. याआधी 2016मध्ये फ्रान्सने युरो कपमध्ये जर्मनीला धूळ चारली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी जर्मनीने गमावली असून फ्रान्सनेच जर्मनीला 1-0 असे पराभूत केले. जर्मनीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु फ्रान्सचा …
Read More »अर्जेंटिनाची चिलीशी बरोबरी
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रिओ दी जानिरो ः वृत्तसंस्थालिओनेल मेसी याने फ्री-किकवर शानदार गोल झळकावल्यानंतरही अर्जेटिनाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. या सामन्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहण्यात आली.पहिल्या सत्रात मेसीने फ्री-किकवर डाव्या पायाने मारलेला फटका चिलीच्या बचावपटूंच्या डोक्यावरून जात गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होने …
Read More »‘विस्डन’च्या ऑल फॉरमॅट संघाचे विराटकडे कर्णधारपद
भारताच्या एकूण चार खेळाडूंचा संघात समावेश लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विस्डनने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार्या खेळाडूंचा संघ बनवला असून त्याचे कर्णधारपद विराटकडे सोपविण्यात आले आहे. या टीममध्ये एकूण चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.असा आहे संघविराट कोहली (कर्णधार), रोहित …
Read More »स्पेन-स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत
युरो चषक स्पर्धा सेव्हिल (स्पेन) ः वृत्तसंस्थायुरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेला स्पेनविरुद्ध स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्यामधील एका निर्णायक गोलच्या अपेक्षेने सामन्यात पहिल्या हाफनंतर एक तर दुसर्या हाफनंतर पाच मिनिटे वाढवून देण्यात आली. तरीही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्पेनने स्वीडनच्या गोलपोस्टवर अनेकदा गोल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र …
Read More »अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडची युक्रेनवर मात
युरो कप स्पर्धा अॅमस्टरडॅम ः वृत्तसंस्थायुरो कपमधील नेदरलँड विरुद्ध युक्रेन सामना अगदी अटीतटीचा झाला. पहिल्या हाफमध्ये एकही गोल न करता आलेल्या दोन्ही संघांनी सामन्याच्या शेवटच्या 45 मिनिटांमध्ये एकूण पाच गोल केले. सामन्याच्या 85व्या मिनिटाला 2-2ची बरोबरी फोडणारा तिसरा गोल करीत नेदरलँडने निसटता विजय मिळवला. हा निर्णायक गोल नेदरलँडच्या डमफ्राइजने केला.पहिल्या …
Read More »‘त्या’ धडकेनंतर प्लेसिसला मेमरी लॉसचा होतोय त्रास
कराची ः वृत्तसंस्थापाकिस्तान सुपर लीग टी-20 मालिकेदरम्यान एका सामन्यात आपल्याच संघातील खेळाडूशी क्षेत्ररक्षण करताना धडक होऊन जखमी झालेल्या फाफ ड्यू प्लेसिसच्या स्मृतीवर काही प्रमाणात परिणाम (मेमरी लॉस) झाला आहे, परंतु त्याची प्रकृती उत्तम आहे.पेशावरच्या डावाच्या 19व्या षटकात सीमारेषेपाशी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात ग्लॅडिएटर्सच्या ड्यू प्लेसिसचे डोके क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या मोहम्मद हसनैनशी अनवधानाने …
Read More »फ्रेंच ओपेनचा जोकोव्हिच जेता
पॅरिस ः वृत्तसंस्थातब्बल सव्वाचार तास झुंज देत चाहत्यांना अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार्या नोव्हाक जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते त्याला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले.ग्रीसचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper