Breaking News

Ankit Shah

सतीश लेले ‘कोविड योद्धा’ने सन्मानित

रेवदंडा ः प्रतिनिधी – नागाव येथील कार्यतत्पर तसेच परिसरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे रेवदंडा अर्बन बँकेचे संचालक सतीश लेले यांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल परशुराम सेवा संघ महाराष्ट्र व मानवाधिकार सुरक्षा संघ या दोन राज्यस्तरावरील नामांकित संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर …

Read More »

माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षांची पक्षनेतृत्वावर नाराजी

माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महमूद धुंदवारे यांनी पक्षनेतृत्व तसेच  तटकरे कुटुंबीयांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली असून, लवकरच आपण शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. महमूद धुंदवारे गेली तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शेवटी शनिवारी (दि. 4) त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली …

Read More »

रोह्यात पावसाचा जोर कायम; नदीनाले तुडूंब; बळीराजा सुखावला

रोहे ः प्रतिनिधी – रोहा शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोहा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यने नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चांगला पाऊस पडल्याने तालुक्यात लावणीसह अन्य शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सुरू झालेला पाऊस सातत्याने बरसत असल्याने शनिवारीही (दि. 4) पावसाचा जोर कायम असल्याचे …

Read More »

बेशिस्त नागरिकांना दणका

खोपोली पालिकेकडून दंडात्मक कारवाई खोपोली ः प्रतिनिधी – खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी गुरुवारी (दि. 2) एका बैठकीत खोपोली नगरपालिका प्रशासन कोरोनाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करीत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खोपोली पालिका प्रशासनाकडून आक्रमक भूमिका घेत नगरपालिका हद्दीत विविध भागांत धडक कारवाई करण्यात आली. यात रस्त्यावर …

Read More »

गरज जीवनदात्यांची

जगभरात कोरोना महामारीचा फैलाव झाल्यापासूनच प्लाझ्मा थेरपी या साथीवरील उपचारात उपयुक्त ठरु शकेल का या दिशेने विचार सुरु होता. या उपचारपध्दतीचा कोरोनासदृश्य आजारांच्या बाबतीत उपयोग झालेला असल्याने तशी ही उपचारपद्धती नवीन नाही. परंतु कोविड 19च्या संदर्भात ही प्रभावी ठरते आहे असे म्हणण्यासाठी तिच्या पुरेशा व्यापक वैद्यकीय चाचण्या होण्याची गरज आहे. …

Read More »

पनवेल तालुक्यात 233 नवे कोरोना रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाचे तब्बल 233  रुग्ण आढळले आहेत. तर 68 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 186 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 61 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 47 रुग्ण आढळले तर सात रुग्ण बरे झाले आहे. महापालिका हद्दीत …

Read More »

‘कलादर्पण’चा ऑनलाइन विठुजागर

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेल येथील ’कलादर्पण’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारानी आपापल्या घरातूनच ऑनलाइन सादरीकरण करून विठ्ठल भक्तीचा जागर केला. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या शीर्षकाने संपन्न झालेला हा …

Read More »

भोरघाटात रस्ता पुन्हा खचला; धोकादायक एकेरी वाहतूक सुरू

महाड : प्रतिनिधी – महाड पुण्याला जोडणारा वरंध-भोर घाट पुन्हा एकदा खचला असुन, रस्त्याचा अर्धाअधिक भाग दरीत कोसळला आहे. ही घटना भोर तालुका हद्दीत घडली असुन साबा विभागाने एकेरी वाहतूक सुरु ठेवली असली, तरी ती धोकादायक असुन कधीही हा घाट पुर्णपणे दरीत कोसळून बंद होऊ शकतो. महाड तालुक्याला पुण्याला जोडणारा …

Read More »

‘कोरोना काळात कुटुंबाची साथ, मानवता महत्त्वाची’

पनवेल : रामप्रहर वृत्त – एकविसाव्या शतकातल्या दुसर्‍या दशकाच्या अखेरच्या वर्षात संपूर्ण मानवजात एका अकल्पित आणि भयावह चक्रात सापडली आहे. कोरोना विषाणूच्या अनाकलनीय व्यूहात सारे जग व्यापून गेले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ आणि मानवता महत्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त ’विठू …

Read More »

पावसाची दमदार हजेरी

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात मागील 10 ते 12 दिवस कडक ऊन्हामुळे भाताची रोपे करपून गेली. याशिवाय बाकी ठिकाणच्या शेतकर्‍यांच्या भाताची रोपे तयार झाली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे रखडली होती. काल सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने आत्ता शेतीच्या कामांना आत्ता खर्‍या अर्थाने वेग येणार …

Read More »