Breaking News

Ankit Shah

झोपडपट्टीधारकांना पनवेल मनपाकडून अन्नछत्र

संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालया समोर आणि बालभारती जवळ झोपडपट्टी आहे. लॉकडाऊन असल्याने याठिकाणी राहणार्‍यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी संबंधित झोपडपट्टी धारकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी …

Read More »

भारतीय जनता पक्षातर्फे विनामूल्य खारपाडा-अलिबाग-मुरूड बससेवा

अलिबाग : प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये नियम शिथील करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन काळात अडकेलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ …

Read More »

आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. राज्यातले आदिवासी हे महाराष्ट्राच्या जनतेचा अविभाज्य भाग आहेत. आदिवासी भागातील लोक डोंगरावरती राहत असल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास त्रास सहन करावा लागतो. म्हणून नेक्स्ट व्हेंचर यांच्या सहकार्याने पनवेलमधील आदिवासी गरजू कुटुंबियांना किराणा …

Read More »

समाजसुधारक स्व. नानासाहेब पाटील

शेकापचे ज्येष्ठ नेते व परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब पाटील यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाविषयी आत्मियता असणारा, परंतु समाजातील जुन्या अनिष्ट रुढी, परंपरा झुगारून देऊन नव्या विकासात्मक विचारांची गुढी उभारणारा नेता आपल्यातून हरपला आहे. नानासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक सुधारणांचाच विचार केला. नुसता विचार …

Read More »

उलवे, कोप्रोली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे व कोप्रोली येथे एक एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उलवे येथील निल सिध्दी जोया सोसायटी, बी विंग, ही इमारत व कोप्रोली येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था, ई विंग, ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी …

Read More »

फुटपाथ, हातगाड्यांवरील फेरीवाले हटविण्यात यावे

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल येथील हातगाडी आणि फुटपाथवर अनेक भाजी व फळ विक्रेते उभे राहत असल्याने तेथे गर्दी होत आहे, कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता तेथे काही नागरीक खरेदीसाठी येतात. म्हणून हे फुटपाथवर बसणारे तसेच हातगाड्यांवर विकणार्‍या फेरीवाल्यांना हटविण्यात यावे, …

Read More »

डॉ. अमित दवे यांची शासनाच्या कोविड टास्क फोर्स समितीवर नियुक्ती

पनवेल : प्रतिनिधी – डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची राज्य शासनाने कोविडच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्याकरिता टास्क फोर्स ऑन आयुष समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर …

Read More »

चौक येथून मजूर पनवेलकडे रवाना

मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन व संचारबंदीत शिथिलता दिल्याने चौक परिसरातून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी पनवेल रेल्वेस्टेशनला 12 बसेसमधून 286 मजूर रवाना झाले. आपापल्या गावाला जाण्याची मुभा मिळाल्यावर चौक परिसरातून अनेक उत्तरप्रदेशमधील कामगार कुटुंबातील सदस्यांसह गावी जाण्यासाठी चौक येथील स्वराज हॉटेल जवळ शेकडोंच्या संख्येने जमा झाले होते. खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या …

Read More »

नवी मुंबईत भाजपतर्फे सफाई कामगारांना धान्याचे वाटप

नवी मुंबई : प्रतिनिधी – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अत्यंत गरजवंतांना मोफत धान्य वितरणाचा धडाका सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सफाई कर्मचार्‍यांची आवश्यकता ओळखून …

Read More »

कर्जत बाजारपेठेतील मिरची दहिवलीत

कर्जत : बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून कर्जत बाजारपेठेत मिरची घेण्यासाठी पनवेल, मुरबाड, कल्याण, बदलापूर, उरण येथून अनेक नागरिक येत होते. हे सर्व लोक रेड झोन असलेल्या भागातून येत असल्याने कर्जतकरांनी आवाज उठवला होता. त्यामुळे व्यापारी फेडरेशनने तात्काळ निर्णय घेवून मिरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा मिरची …

Read More »