Breaking News

Ankit Shah

नवी मुंबईत आढळले 64 रुग्ण; एकूण संख्या 974

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी (दि. 14) कोरोना विषाणूची लागण झालेले 64 रुग्ण आढळल्याने बधितांची एकूण संख्या 974 झाली आहे. गेले आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमवार आला होता, मात्र गुरुवारी पुन्हा त्यात वाढ झालेली दिसून आली. आजतागायत 7653 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज जयंती घराघरात साधेपणाने साजरी

उरण : वार्ताहर – छत्रपती संभाजी महाराज यांची चिरनेर येथे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी जयंती साजरी होत असते. परंतू कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या वर्षी ही जयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आयोजक छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कडू यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करुन केलेल्या आवाहनानूसार शिवभक्तांनी आपापल्या …

Read More »

शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड

बीडमधील घटनेने खळबळ बीड ः प्रतिनिधी – शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. प्राथमिक माहितीनुसार सामूहिक हल्ल्यातून तिघांची हत्या झाली असून अन्य एक जखमी आहे. मृतांमध्ये बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार या तिघांचा समावेश आहे, …

Read More »

पाली, जांभूळपाडा, भालगूल पुलांच्या कामाला वेग

पाली : प्रतिनिधी – वाकण-पाली-खोपोली राज्य मार्गावरील पाली येथील अंबा नदीवर नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. नवीन पूल अधिक उंच व रूंद असणार असून, त्याची भार पेलण्याची क्षमता तब्बल 75 टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीन पट अधिक असेल. या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी प्रवासी …

Read More »

आमदार निधीतून नवी मुंबईसाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : बातमीदार – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलकरिता आमदार निधीतून खास बाब म्हणून पाच अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन केली आहे. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत …

Read More »

नेरूळ गाव बनतेय हॉटस्पॉट

गावातील मुख्य मार्गावर अद्यापही गर्दी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग मानला जाणार नेरुळ विभाग देखील मागे राहिलेला नाही. यातील महत्वाची बाब म्हणजे नेरुळ गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून अजिमितीस 11 रुग्ण सापडले असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नेरुळ गावात …

Read More »

प्रत्येकासाठी काही तरी…

जीविताच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक होता. पण लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहार जवळपास 50 टक्क्यांनी थांबले. जवळपास प्रत्येकच क्षेत्राला फटका बसल्याने संघटित आणि असंघटित क्षेत्रातील असंख्य लोकांची उपजीविका सावरण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळेच प्रत्येक आर्थिक वर्गातील लोकांना येत्या काळात मदतीचा हात देण्यास केंद्र सरकार खंबीरपणे पुढे सरसावले आहे हे गेल्या दोन दिवसांत …

Read More »

खोपोलीतील ‘त्या’ मुलाबाबत उलगडा

आई रागावल्याने घर सोडून आला होता खोपोली : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात अनेक सुखद, तर कधी मन हेलावणार्‍या घटना घडत असून, खालापुरात रस्त्याच्या कडेला प्रसुती झालेल्या बाळाचे कोडकौतुक सुरू असताना दुसर्‍या घटनेत रागात घर सोडून आलेल्या 12 वर्षांच्या मुलाची तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी मुंब्र्यातील आई-वडिलांशी संपर्क करून दिला आहे. आई …

Read More »

जागतिक आरोग्य संघटनेकडून खाण्या-पिण्याबाबत गाईडलाईन

कोरोना व्हायरसबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (व्हू)ने वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. आता ‘व्हू’कडून खाद्यपदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना पाळणे सोशल डिस्टन्सिंगएवढेच गरजेचे आहे. जेवण तयार करताना किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्याआधी हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावेत. …

Read More »

कर्जत रोटरी क्लबतर्फे मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून, पोलीस, नगर परिषद कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यांच्यासह रस्त्यावर भाजी विके्रत्यांना रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी चारफाटा, श्रीराम पूल, बाजारपेठ आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत अश्या कर्मचार्‍यांना, तसेच नगर …

Read More »