Breaking News

Ankit Shah

अंगणवाडी सेविका, आशा वर्करच्या प्रसंगावधनाने महिलेची यशस्वी प्रसूती

अलिबाग : जिमाका – पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी कांबळे यांच्या लक्षात आले की, मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधनाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता …

Read More »

मोहोपाडा व्यापारी असोसिएशनतर्फे गोरगरिबांना किराणा सामानाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी – गोरगरिबांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोपाडा व नवीन पोसरी परिसरातील गरजु व गोरगरिबांच्या 105 कुटूंबांना मोफत धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले. या वेळी परिसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगारवर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह …

Read More »

गरीब, गरजूंसाठी भाजपचा पुढाकार

आकाश जुईकर यांचा मदतीचा हात मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी परिसरात गोरगरिबांच्या हाकेला धावणारे भाजपचे वासांबे पंचायत समिती अध्यक्ष व भाजप कामगार विभागाचे सरचिटणीस आकाश अमृत जुईकर यांनी मोहोपाडा पंचशिलनगर, खाने आंबिवली, नवीन पोसरी व परीसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगार वर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह …

Read More »

देशाचे दीपस्तंभ

जनतेने निव्वळ मनोभावे दिवेच प्रज्वलित केले नाहीत, तर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी समाजमाध्यमांवर या उपक्रमाद्वारे आपल्याला कशी विलक्षण जादूई अनुभूती मिळाली याचे वर्णनही केले. आपल्या अनोख्या उपक्रमांतून मोदी जनतेची आंतरिक शक्ती कशी वाढवत आहेत याचेच दर्शन समाजमाध्यमांवरील या प्रतिक्रियांमधून घडते. जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. भारतातली परिस्थिती युरोप-अमेरिकेच्या तुलनेत …

Read More »

एक दिवा एकात्मतेचा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद उरण : वार्ताहर – कोरोनाला आपण निश्चित परतवुन लाऊ एक दिवा एकात्मतेचा, असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला समस्त देशवासीयांनी प्रतिसाद दिला. रविवार (दि. 5) रात्री 9 वाजता 9 मिनिटे देश भारत सर्व ठिकाणी दिप प्रज्वलित करून कोरोना विरोधाच्या संघर्षात आणखी …

Read More »

श्री साई नारायणबाबा मंदिराकडून गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने आजही गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप त्याचप्रमाणे 140 विधवा माता-भगिनींना पूर्ण महिन्याचे रेशन श्री साई नारायणबाबा यांच्या हस्ते देण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावावर हातावर पोट असणार्‍या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. …

Read More »

मास्कविक्रीच्या बहाण्याने फसवणूक

पनवेल : बातमीदार – कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वापरण्यात येणारे मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या मागणीत वाढ झाल्याची संधी साधून या वस्तूंच्या विक्रीच्या बहाण्याने टोळीने ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या टोळीने देशभरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. एन-95 मास्क व वैयक्तिक सुरक्षा …

Read More »

सहा कोरोनाबाधित उपजिल्हा रुग्णालयात

पनवेल : बातमीदार – पनवेलमधील सहा सीआयएसएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांना पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 21 जवानांना पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या खारघर येथील ग्रामविकास भवनमधील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पनवेलमधील कळंबोली येथे सीआयएसएफचे मुख्यालय आहे. येथे सीआयएसएफचे 147 जवान वास्तव्यास आहेत. …

Read More »

कोरोनाचे सावट : यात्रा, पालख्या रद्द

उरण : रामप्रहर वृत्त – चैत्र महिना म्हटले की, गावागावात पारंपरिक यात्रा-पालखी उत्सवाला जल्लोषात सुरुवात होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट यावर असणार आहे. त्यामुळे गावोगावचे जत्रोत्सव रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना आपापल्या घरातच पूजा करून देवीची आराधना करण्याच्या सूचना दिल्याच्या समजते. उरण-पनवेल आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जात आहे. …

Read More »

गरीब, गरजूंना 15 दिवस पुरेल एवढ्या धान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील डी. एन. मिश्रा रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय मोर्चा व यांचे मित्र सुरेंद्र शुक्ला समाराम चौधरी रामदेव पांडे यांनी मिळून गरजू गरीब कुटुंबातील लोकांना 15 दिवस पुरेल अशा रेशनचे वाटप केले. यामध्ये कळंबोलीतील 150 कुटुंब, पेंदर गावातील 35 कुटुंब, तोंडरा …

Read More »