पनवेल : प्रतिनिधी : आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड्. महाविद्यालयात शनिवारी (दि. 29) मराठी भाषा दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या वेळी ग्रंथालयात मराठी व विज्ञान विषयावरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. शनिवारी विज्ञान दिनानिमित्त आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या …
Read More »नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ
नवी मुंबई : बातमीदार : सभागृह नेते तथा भाजपचे नगरसेवक रवींद्र इथापे व माजी नगरसेविका सुरेखा इथापे यांच्या वतीने शनिवारी (दि. 29) कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्याचे व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे व कार्यअहवालाचे …
Read More »आवरे येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिन
उरण : प्रतिनिधी : आत्माराम ठाकूर मिशनचे जे. जे. ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे येथे जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत …
Read More »गुळसुंदे हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा
रसायनी : रामप्रहर वृत्त : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिरात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान दिनानिमित्त वांद्रे (मुंबई) येथील अध्ययन संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्ययन …
Read More »वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव
पनवेल : रामप्रहर वृत्त : वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी संपदा पालव यांचे सोमवारी (दि. 2) अभिनंदन केले. संपदा पालव यांची वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल …
Read More »दिल्लीच्या दोन बाजू
राजधानी दिल्लीच्या दोन बाजू गेल्या दोन दिवसांत बघाव्या लागल्या आहेत. ज्या राजधानीत मैत्रीचा हात पुढे करत सौहार्द भावनेने दोन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू पाहत होते, त्याच राजधानीत सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) विरोधकांनी धुडगूस घालून कायदा-सुव्यवस्थेला वेठीस धरले, हे निंदनीय आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौर्यावर आलेले असताना …
Read More »पनवेलमध्ये आरोग्य शिबिराला प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी : पनवेलमध्ये रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला 650 नागरिकांनी या शिबिरात आपली तपासणी करून घेतली. पनवेलमधील 52 बंगलो येथे जनजागृती ग्राहक मंच, पनवेल तालुका निवृत सेवक संघ, अंकुल फाऊंडेशन मोरबे आणि वेदिक आयूर क्युयर हेल्थ आणि रिटेल्स प्रा. …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा – अॅड. नागेश जायभाय
उरण : वार्ताहर : केवळ शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन त्यांचे विचार समाजात रुजणार नाहीत तर स्वतःमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहावे लागेल, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अहमदनगर येथील अॅड. नागेश जायभाय यांनी व्यक्त केले, ते रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान …
Read More »नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे दुर्घटनेची शक्यता
पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे नागरिक आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही महावितरणच्या अधिकार्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नवीन पनवेल मधील सेक्टर 12 मधील रस्ता नं. 11 वरील प्लॉट नं. 14 जवळ रस्त्याला लागून महावितरणचा डीपी आहे. या …
Read More »चिरनेर येथे 30 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर : उरण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चिरनेर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे सेकंडरी स्कूल चिरनेर या शाळेतील 1990 साली एसएससीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 30 वर्षांनंतर चिरनेर येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी कृष्णा सोमा केणी यांच्या पुरणशेत येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper