महाड : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार आणि फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू आहे. या बंदीदरम्यान गरीबांना मोफत धान्य देण्याची केंद्राची योजना असून राज्य सरकारने ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. महाड तालुक्यातील रेशन दुकानावर त्याचे वाटप सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या विषाणूविरोधात लढण्यासाठी देशवासीयांना …
Read More »भाजपकडून गरिबांना मदतीचा ओघ
महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्याकडून 230 आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे आदिवासी कुटुंबियांना हाल सहन करावे लागत असल्याचे निदर्शनास येताच, भाजपचे महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी गावचे माजी सरपंच महेश कडू यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच उरण व पनवेल तालुक्यातील …
Read More »निसर्गाचे स्वच्छता अभियान!
लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली. याचा तत्काळ दिसून आलेला परिणाम म्हणून ठिकठिकाणी पक्ष्यांची किलबिल विशेष प्रयास न करताही ऐकू येऊ लागली. अनेक ठिकाणी मोर रस्त्यांवर वा निवासी वस्त्यांमध्ये अवतरले. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे जगभरातील लोकांचे डोळे …
Read More »नेरळमधील रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद; 155 दात्यांचा सहभाग
कर्जत ः बातमीदार – कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन अथक प्रयत्न करीत असून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नेरळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. दरम्यान, नेरळमधील …
Read More »भटक्या कुत्र्यांना अन्नदान; रोह्यातील प्राणीमित्रांनी जपली भूतदया
रोहा ः वार्ताहर – देशभरातील लॉकडाऊनमुळे भटके श्वान, रस्त्यावर फिरणार्या गायी तसेच अन्य प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर रोह्यातील प्राणीमित्र कुमार देशपांडे, शेखर सप्रे, स्वप्ना सप्रे व रोह्यातील अन्य प्राणीमित्रांनी एकत्र येत विशेष अभियान हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात ते रोह्यातील प्राण्यांना नित्यनेमाने दहीभात …
Read More »शिक्षकांकडून एसटीचालक, आदिवासींना मदतीचा हात
मुरूड ः प्रतिनिधी – संचारबंदीच्या काळात येथील श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर नांदगाव हायस्कूलमधील मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने मुरूड आगारातील एसटी चालक-वाहक व काशीद ग्रामपंचायतीमधील दोन आदिवासीवाडीमधील लोकांना तांदूळ, डाळ व गोडेतेल पाकिटांचे वाटप केले. या वेळी मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, …
Read More »बँक ऑफ इंडियाकडून निराधार महिलांना धान्यवाटप
महाड ः प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब मजुरांचे रोजगाराअभावी हाल होऊ लागले आहेत. तसेच निराधार महिलांना कोणताच रोजगार नाही आणि त्यामुळे अन्नधान्यही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने पुढे येत या महिलांना आधार दिला आहे. देशासह राज्यात कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. निराधार महिलांना …
Read More »निजामपूरला पाणीटंचाईचे चटके कायम
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पायपीट माणगाव ः प्रतिनिधी – भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यामुळे नदी, विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू लागल्याने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. निजामपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून गेली अनेक दिवसांपासून निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व …
Read More »वडापाव बंदचा अनेकांना फटका
पनवेल : प्रतिनिधी – मुंबईच्या नाक्या-नाक्यावरच नव्हे तर संपूर्ण राज्यात हातगाडीवार दिसणारा गरिबांच्या भुकेचा आधार असलेला वडापाव कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाक्यावरून हद्दपार झालेला दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये खाद्य पदार्थांची दुकाने, बेकरी एवढेच कशाला चिकन-मटणाची दुकाने उघडी आहेत. पण सेना प्रमुखांनी मराठी तरूणाला रोजगार मिळावा म्हणून सुरू केलेला वडापावच्या गाड्या मात्र बंद असल्याने …
Read More »चिर्ले येथे स्वच्छता मोहीम
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी औषध फवारणी उपक्रमानंतर येथील वन्यजीव निसर्ग मित्र आंनद मढवी यांच्या पुढाकाराने आणि तरुणांच्या सहकार्याने चिर्ले गावात नाले, गटारे सफाईचे काम हाती घेतले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सार्यांनीच एकत्रित येऊन गाव परिसर स्वच्छ करू या, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper