Breaking News

Ankit Shah

माची प्रबळगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी

पनवेल ः बातमीदार  : जगभरासह महाराष्ट्रतदेखील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या विषाणूंचा संसर्ग वाढू नये म्हणून माची प्रबळ गड येथे पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत येथे जाण्यास संयुक्त वन व्यवस्थापन समितीने बंदी घातली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅम्पिंगसाठी प्रबळ माची उत्तम जागा …

Read More »

नेरूळमध्ये मोफत मास्कवाटप

नवी मुंबई ः प्रतिनिधी :  कोरोना या महाभयंकर रोगाने जगभर थैमान घातले आहे.  राज्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत भीम महोत्सवचे प्रणेते राजगृह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक शरद (भाऊ) सरवदे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, …

Read More »

मास्क, हातमोजांची सक्ती करावी -नगरसेवक विजय चिपळेकर

पनवेल ः वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे नगदी नोटा, वस्तू यांची आदान-प्रदान होणार्‍या ठिकाणी मास्क व हातमोजे वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नगरसेवक विजय चिपळेकर यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रात येणारे …

Read More »

कोरोना रोखण्यासाठी पोलिसांची जनजागृती

पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः वार्ताहर : कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी वपोनि. अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची जनजागृती मोहीम सुरू केली असून या मोहिमेला पनवेलकरांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले. वपोनि. अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, विजय तायडे यांनी हद्दीतील सर्व मशिदी, मंदिरांचे मौलाना …

Read More »

पारंपरिक भांडी व्यवसायाला घरघर

महाडमधील पारंपरिक भांडी व्यवसाय आता हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी महाडमध्ये भांडी घडवण्याचा मोठा व्यापार होता तो केवळ चाळीस ते पंचेचाळीस कारखान्यांवर येवून ठेपला आहे. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने तरुण पिढी यामधून बाहेर पडू लागली आहे. महाड हे पूर्वीचे बंदर असलेले व्यापारी केंद्र. बौद्ध काळापासून …

Read More »

अग्निपरीक्षा टळली इतकेच

भाजपकडे 106 एवढे संख्याबळ आताच आहे. त्यात पुढे वाढच होईल. अशी परिस्थिती असताना देखील मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लोकशाहीची कुठलीही तमा न बाळगता खुर्चीला चिकटून राहणे पसंत केले. आपले सरकार अल्पमतात आल्याचे लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिला असता तर लोकशाहीची मूल्ये खचितच पाळली गेली असती. परंतु काँग्रेसच्या संस्कृतीत असा राजकीय उमदेपणा …

Read More »

उलवे नोड येथे महिला दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त : उलवे नोड येथे भारतीय जनता पक्ष आणि उलवा तमिळ संघ यांच्या वतीने शनिवारी (दि. 14) महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजपच्या पनवेल तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत याची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात प्रथम मराठी मुट कोर्ट स्पर्धा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांची कामकाजाची भाषा मराठी असल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून न्यायालयात युक्तीवाद कसा करावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरीता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकरीता शनिवारी (दि. 14) पहिल्या महाविद्यालयीन मराठी मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबतर्फे वृक्षारोपण

पनवेल : वार्ताहर : पनवेल शहरातील डॉक्टर, वकील, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रितपणाने सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. पनवेलकरांचे आयुष्य आनंदात जावे. त्यांना शुद्ध ऑक्सिजन तसेच सावली मिळावी व भावी पिढीही याचा आनंद घेऊ शकेल, या उद्देशाने पनवेलमधील 40च्या वर वयोमान असलेल्या सीनिअर्स ई-क्रिकेट क्लबतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम …

Read More »

खारघरच्या नागरिकांनी केला मैदाने स्वच्छ करण्याचा संकल्प

खारघर : रामप्रहर वृत्त : रविवार सुटीचा दिवस असल्याने सुटीचा सदुपयोग करण्यासाठी खारघरच्या काही नागरिकांनी एकत्र येऊन खारघर सेक्टर 19 येथील खेळाच्या मैदानावरील झाडांना पाणी देणे तसेच मैदानात स्वच्छता अभियान राबवून मैदाने स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. या वेळी जमलेल्या नागरिकांनी मैदानाच्या सभोवताली असणार्‍या सर्व झाडांना पाणी देण्याचे अभियान राबविले आणि …

Read More »