Breaking News

Ankit Shah

बालकलाकारांच्या गायनाने पनवेलकर मंत्रमुग्ध

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : आदईतील पियूष म्युझिक क्लासच्या वतीने एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध गायिका पद्मजा जोशी यांच्या शिष्यगणांचे गायन झाले. नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. चंद्रकांत व छाया जोशी या उभयतांच्या हस्ते या संगीत वार्षिकोत्सवाचे उद्घाटन झाले. पियूष …

Read More »

‘तो रुग्ण देखरेखीखाली होता’

पनवेल : प्रतिनिधी : कामोठे येथील कोरोनाचा पॉझिटिव्ह ठरलेला रुग्ण 12 दिवस आमच्या देखरेखीखाली होता. वीणा ट्रॅव्हलमधून सहलीला गेलेल्या ग्रुपपैकी तो होता. आम्ही त्यांना कस्तुरबामध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील पती-पत्नीपैकी एक जण पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीत कामोठे येथील एक रुग्ण …

Read More »

सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन!

भारतीय राजकारणात उत्तरेकडचे राजकारण, दक्षिणेकडचे राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात विविध प्रकारचे कांगोरे आहेत. उत्तरेकडील राजकारणाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी वेगवेगळे किस्से ऐकविताना सांगितले आहे. काही आदर्श राजकारणी, समाजकारणीसुद्धा उत्तर भारतात पाहायला मिळाले आहेत, पण सांस्कृतिक, सुसंस्कृत राजकारणात महाराष्ट्र …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल

युवा (19 वर्षांखालील) वन डे विश्वचषकापाठोपाठ महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून पाचव्यांदा हा चषक उंचावला. या स्पर्धेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात भारतीय महिलांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी त्यांनी …

Read More »

सडेतोड उत्तर

आपल्या विरोधात जाणारे मुद्दे देखील ऐकून घेण्याची क्षमता सत्ताधार्‍यांप्रमाणेच विरोधकांमध्येही असावी लागते. पण काँग्रेसला त्याची सवयच नाही. याच वृत्तीमुळे देशभरात काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली आहे. निरर्थक अहंकार आणि सत्तेचा दर्प या दोन दुष्प्रवृत्तींमुळे काँग्रेससारखा पक्ष आज लयाला जाण्याची चिन्हे दाखवत आहे. दिल्लीच्या दंगलींबाबत गृहमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनासंदर्भात काँग्रेसने थोडी सहिष्णुता …

Read More »

कमळ पुन्हा हसले!

ज्योतिरादित्य हे एका मातब्बर राजघराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याची नाळ महाराष्ट्रात पुरलेली आहे. संपूर्ण आयुष्य मध्यप्रदेशात व्यतीत करूनही त्यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले नाते तोडलेले नाही. आपल्या वडिलांप्रमाणेच ज्योतिरादित्य देखील उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कारी आहेत. गेली जवळपास दोन वर्षे ज्याची प्रतीक्षा होती ते घडते आहे. होलिकोत्सवाच्या शुभमुहुर्तावर मध्यप्रदेशात कमळ पुन्हा एकदा हसते …

Read More »

सहयोग गोशाळा एक स्तुत्य उपक्रम

आपल्या देशात गाय हा संवेदनशील विषय ठरला आहे. गोहत्येवरून वाद होत आहेत. गोवंशाचे संरक्षण व्हायला पाहिजे, असे सर्वच बोलत असतात. गोमाता हे हिंदू समाजाचे श्रध्दास्थान, परंतु श्रध्देच्या पलीकडे जाऊन भारतीय गोवंशाकडे पाहिले जात नाही.  गोवंशाची हत्या करू नये म्हणून सांगायचे, परंतु  गोवंशाचे  पालन व संवर्धन  करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. …

Read More »

सीधी नजर, उल्टा चष्मा

एका मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेल्या संवादात मुंबईची भाषा कोणती याची चर्चा होण्याचे मुळातच काही कारण नाही. मालिकांनी रसिकांचे मनोरंजन साधता येईल ते साधावे. उगीचच राजकीय विषयांना निष्कारण वादाची फोडणी देऊन वातावरण ढवळून काढण्याची उठाठेव करू नये. हे तारतम्य सर्वच टीव्ही मालिकांनी ठेवावे हे इष्ट. भारतातील जवळपास शंभर कोटीहून अधिक लोकसंख्या …

Read More »

नाणार प्रकल्पावरून महाआघाडीत बिघाडी

झालाच पाहिजे, झालाच पहिजे, ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, अशा घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला. आम्हाला प्रकल्प हवा यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आता रायगडमध्ये येणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प रोहा भागात  येणार की नाही, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून  नाणार प्रकल्पाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला …

Read More »

राखेतले निखारे

राजधानीत घडून गेलेल्या दंगलींच्या पाठीमागे सोशल मीडियातील स्वैराचार आहे हे आता उघड झाले आहे. समाजामध्ये अशांतता पसरवू पाहणारे राष्ट्रद्रोही घटक आणि त्यांच्या सुरात सूर पसरवू पाहणारे विरोधीपक्ष हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. दिल्लीतील दंगलींना खतपाणी कुणी घातले हे देखील आता स्पष्ट होऊ लागले आहे. आणखी खेदाची गोष्ट म्हणजे, जबाबदार …

Read More »