नागोठणे : प्रतिनिधी : येथील किराणा, मेडिकल तसेच दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (दि. 23) आपले व्यवसाय चालू केले होते, मात्र सकाळी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात करून अनेकांचे दरवाजे बंद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्याची घोषणा करण्यात …
Read More »अनावश्यक गर्दीवर नजर; खोपोलीत निर्बंध पाळण्यासाठी सूचना व आवाहन
खोपोली : प्रतिनिधी : कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र दुसर्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान खोपोली बाजारात लोकांची अनावश्यक गर्दी झाल्याचे चित्र होते. यातील फारच कमी लोक अतिमहत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले होते, तर बहुतांश नागरिक काय चालले आहे? बाजारातील …
Read More »जनतेचे अभिनंदन व आभार!
महाभयंकर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सुमारे 130 कोटी लोकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर यातून देशवासीयांचेच जीवन सुरक्षित होणार आहे. तरीही देशाच्या दृष्टीने आवश्यक असलेली बाब कटाक्षाने पाळून भारतीयांनी संपूर्ण जगाला नवा आदर्श घालून दिला आहे. चीनमधून पसरलेला …
Read More »स्वागतार्ह नियुक्ती
दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलींबद्दल राजीव गांधी यांना निर्दोष प्रमाणपत्र देणारे न्या. रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. राज्यसभेवरील नियुक्ती ही राजकीयच असते. त्यामुळे त्याबाबत राजकारण होणे हे ओघानेच आले. परंतु मुद्दा आहे तो उत्कृष्ट गुणवत्तेचा देशासाठी …
Read More »भूखंड वापर बदल, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाबाबत सिडकोचे नवीन धोरण
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा : सिडको संचालक मंडळाच्या फेब्रुवारी 2020मध्ये पार पडलेल्या बैठकीत भूखंड वापर बदल व अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याबाबतचे व्यापक धोरण ठरविण्यात आले असून त्यानुसार भाडेपट्टा अधिमूल्य आकारून विविध वापरासाठी दिलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देण्यासह भूखंड वापर बदल करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबईसाठीचे …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीची सभा पुन्हा स्थगित
पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिकेचा 2019चा सुधारित व 2020-21च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. 17) झालेली स्थायी समितीची सभा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. या वेळीही संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. स्थायी समितीसमोर 6 मार्चला सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी 12 मार्च रोजी स्थायी समितीची सभा …
Read More »कोरोना व्हायरससंदर्भात नवी मुंबईत डॉक्टरांचे प्रशिक्षण
नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग व ‘इ’प्रभाग समिती सदस्य डॉ. प्रतीक प्रभाकर तांबे यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 14) हिम्पाम, नवी मुंबई व निमा, नवी मुंबई या वैद्यकीय संघटनेच्या सर्व डॉक्टरांचे प्रशिक्षण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाले. कोरोनासंदर्भात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नवी …
Read More »अत्यावश्यक कामाशिवाय जनतेने बाहेर पडू नये -महसूल आयुक्त शिवाजी दौंड
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : कोकण विभागातील जनतेला आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनासंदर्भात कोकण विभागात शासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या यंत्रणा कार्यान्वित झाल्या असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा काम करीत असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांत कोकण …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही दक्ष
पनवेल ः रामप्रहर वृत्त : देशभर उद्रेक माजवलेल्या कोरोनाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. शाळा, कॉलेजेस, मॉल्स तसेच विविध कार्यक्रमही शासनातर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी 24 तास कर्तव्य बजावत असणार्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनीही सतर्कता दर्शविली आहे. पोलीस ठाण्यात …
Read More »महाडमध्ये कोरोनटाईन सेंटर कार्यान्वित; चार जण निरीक्षणाखाली
महाड : प्रतिनिधी : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोना व्हायरसमुळे महाडमधील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शाळा तसेच किल्ले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper