मालमत्तेचे नुकसान, जीवितहानी नाही खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील साजगांव-आडोशी औद्योगिक क्षेत्रातील पुष्पम फोरजींग कंपनीत शनिवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्या परिसरात सर्वत्र ऑइल मिश्रीत ड्रम व डबे होते. त्यामुळे ही आग अधिक भडकली. या बाबत कंपनीकडून खोपोली अग्निशमन दल, पोलीस व आपत्कालीन यंत्रणांना माहिती …
Read More »खोपोली, खालापूरात विजेचा खेळखंडोबा
महावितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहक त्रस्त खालापूर : प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खोपोली, खालापूरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एरव्ही वीज बिल थकले की, जोडण्या तोडण्यात तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकार व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. खोपोलीच्या अनेक …
Read More »नागरिकांनी कचरा वर्गीकरण करावे
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार घनकचरा व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन आवश्यक आहे. दररोज कचरा निर्माण होत असतो. यामुळे ओला, सुका व घरगुती घातक पदार्थ अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांचे याकामी चांगले सहकार्य लाभत आहे. मात्र स्वच्छता ही नियमित करण्याची बाब असल्याने …
Read More »मासेमारीवरील बंदी उठूनही मुरूडमध्ये मासळी महागली; मच्छीमार हवालदिल
मुरूड : प्रतिनिधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरूडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या, मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरूडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरु …
Read More »जासईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई गावातील डुंबा व कातकरीवाडीतील इतर पक्षातील सुमारे 100 ते 125 कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 3) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक बळीशेठ, विशाल म्हात्रे, भाजप जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष …
Read More »वाचन म्हणजे स्वतःचा शोध
-शशिकांत सावंत (ज्येष्ठ पत्रकार) तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत …
Read More »पोलादपूर चोळई येथे चोरी; दुचाकी, मोबाइलसह रोख रक्कम लंपास
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई येथे सोमवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास एका घराबाहेरील दुचाकी, घरातील मोबाइल व रोख रक्कम तसेच बॅकेचे पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बांधकाम व्यवसायीक रोहिदास सदाशिव मोहिते यांच्या घरासमोरील हिरो होण्डा पॅशन …
Read More »माणगावातील शिक्षक कॉलनीत घरफोडी
सोन्याचे मंगळसूत्र घेऊन अज्ञात चोरटा फरार माणगाव : प्रतिनिधी माणगाव दत्तनगर भागातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोमवारी (दि. 29) सायंकाळी घरातील 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला. विश्वनाथ हुल्लनाईक तालिमकर (वय 52, रा. शिक्षक कॉलनी, दत्तनगर, माणगाव) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा सोमवारी सायंकाळी …
Read More »माणगावात एसटी चालक, वाहकावर गुन्हा
माणगाव : प्रतिनिधी कर्तव्यावर असताना सोमवारी (दि.29) सकाळी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने तसेच शासकीय पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एसटी चालक व वाहकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एसटी बस (एमएच-13,सीयू-8185) चा चालक ज्ञानेश्वर अशोक कापडी (वय 31, सध्या रा. भिवंडी, …
Read More »सागवानी दरवाजांमुळे कुलाबा किल्ल्याच्या सौंदर्यात भर
अलिबाग : प्रतिनिधी मराठा आरमाराचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याला दोन सागवानी दरवाजे बसवण्यात आले आहेत. खार्या पाण्यापासून हे दरवाजे सुरक्षीत रहावेत म्हणून यावर विशेष लेप लावण्यात आला असून या दरवाजांना ऐतिहासीक रुप देताना टोकदार खिळे, लोखंडी पट्ट्यासह चार इंचाच्या सागवानी मजबूत पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper